पिंपरी आयुक्तांची पाटिलकी, भाजपचा अर्थसंकल्पच फेटाळला

PCMC|Rajesh Patil: पालिकेची मुदत १३ मार्चला संपली असून १४ तारखेपासून प्रशासकांचा कारभार सुरु झाला आहे.
IAS Rajesh Patil
IAS Rajesh PatilSarkarnama

पिंपरी : ८८५ कोटी ६६ लाख रुपयांच्या ५८९ उपसुचनांचा पाऊस पाडीत मंजूर केलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) २०२२-२३ चे बजेट पालिका आय़ुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी मंगळवारी (ता.२९ मार्च) नामंजूर केले. तसेच स्वतचे म्हणजे प्रशासनानेच स्थायीला सादर केलेल्या बजेटला मंजूरी दिली. त्यातून मावळते सत्ताधारी भाजपला (BJP) जोरदार दणका बसला आहे.

IAS Rajesh Patil
आमदार माधुरी मिसाळ कार्यकर्त्याची बाजू घेणार की नागरिकांना साथ देणार?

केंद्र शासनाच्या योजनांसह सहा हजार ४९७ कोटी वीस लाख रुपयांचे पिंपरी पालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे (मूळ बजेट चार हजार ९६१ कोटी ६५ लाख रुपये) अंदाजपत्रक तथा बजेट प्रशासनाने स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत १८ फेब्रुवारीला सादर केले होते. ते उपसुचनांचा वर्षाव करीत ८८६ कोटी रुपयांची वाढ सुचवून स्थायीने २३ फेब्रुवारीला मंजूर केले. तसेच त्यावर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी पालिका सभेकडे पाठवले होते. पण, मार्चची ही सभा वा बजेटसाठीची खास सभा झालीच नाही. दरम्यान, पालिकेची मुदत १३ मार्चला संपली. १४ तारखेपासून प्रशासकांचा कारभार सुरु झाला. त्यामुळे प्रशासकांनी ही बजेटची सभा आज घेतली. त्यात स्थायीने मंजूर केलेले बजेट फेटाळण्यात आले. तसेच प्रशासनाने स्थायीला सादर केलेल्या बजेटलाच मान्यता देण्यात आली. परिणामी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामासाठी आता दरवर्षी २५ लाख रुपये मिळणार नाहीत. तसेच शहरातील दिवंगत उद्योगपती, माजी खासदार पद्मविभूषण राहूल बजाज यांचे स्मारक आणि बीआऱटी थांब्यावर स्वच्छतागृहाची योजनाही बारगळते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. कारण या कामांची शिफारस स्थायीने बजेटला मंजूरी देताना केली होती. पण, प्रशासक आयुक्तांनी आता हे बजेट नाकारले. त्यामुळे पालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सन २०२१-२२ चे सुधारीत आणि २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे आजच्या बैठकीत सादर केले.ते मंजूर करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह नगरसचिव उल्हास जगताप, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य लेख परीक्षक प्रमोद भोसले, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, रामदास तांबे, संजय कुलकर्णी,आदींसह सर्व विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

IAS Rajesh Patil
अनिल देशमुख पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील, आमदार मिटकरींना विश्‍वास…

बजेटसह फेब्रुवारीच्या पालिका सभेतील तहकूब विषयांनाही आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्यात औंध येथील सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल बांधकामासाठी २ कोटी रुपये देणे, भोसरीत पाळीव प्राणी जनावरांसाठी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना उभारणे, शहरातील रस्ते, मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईच्या ३६२ कोटी चार लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली. तरतुद वर्गीकरण, वायसीएम रुग्णालयामधील तात्पुरत्या स्वरूपातील मानधनावरील निवड झालेल्या निवासी उमेदवारांच्या नियुक्तीस कार्योत्तर मान्यता आदी स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांनाही प्रशासकांनी आजच्या बैठकीत मंजूरी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com