Pimpri ED Raid News Update : पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलचंदानी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

ई़डीच्या छाप्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने अमर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pimpri ED Raid News Update : पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलचंदानी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

Pimpri ED Raid News Update : सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बॅंकेतील ४३० कोटी रुपयांच्या बोगस कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहारातील आऱोपी आणि या बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर साधूराम मुलचंदांनी यांच्या पिंपरीतील निवासस्थानी `ईडी`ने परवा (ता.२७)छापा टाकला. पण,तत्पूर्वी दार बंद करून सव्वादोन तास ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना मुलचंदांनी कुटुंबियांनी ताटकळत ठेवले होते. त्यामुळे कटकारस्थान करीत सरकारी कामात अडथळा आणून पुरावा नष्ट केल्याबद्दल अमर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पिंपरी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला. त्यात अमर वगळता इतर पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ई़डीच्या छाप्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने अमर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे ते वगळता त्यांच्या कुटंबातील त्यांचे दोन भाऊ (अॅड अशोक आणि मनोहर) त्यांच्या पत्नी दया आणि साधना तसेच त्यांचा पुतण्या सागर यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी त्यांना सुट्टीतील न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. अशोक मुलचंदानी यांनी अतिरिक्त सरकारी म्हणून शिवाजीनगर,पुणे येथील सत्र न्यायालयात काम केले आहे.याबाबत ईडीचे अधिकारी सुधांशू श्रीवास्तव यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Pimpri ED Raid News Update : पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलचंदानी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल
Shivsena News : खैरे-शिरसाटांचे सूर जुळतायेत का ?

श्रीवास्तव यांच्या तक्रारीनुसार ते शुक्रवारी (ता.२७)सकाळी सहा वाजता जेव्हा कारवाईसाठी मुलचंदानी यांच्या पिंपरीतील `मिस्ट्री पॅलेस`वर गेले तेव्हा सव्वाआठ वाजेपर्यंत आतून कोणी जाणूनबूजून दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संशयित आरोपी पुरावा नष्ट करतील या भीतीने त्यांनी स्थानिक पिंपरी पोलिसांची मदत घेतली.

त्यांनी कुलूप तोडणाऱ्याला बोलावले. पावणेनऊ वाजता ई़डीला मुलचंदानींच्या घरात जाता आले. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांची तपासणी सुरु होती. त्यात त्यांना एक खोली बंद दिसली. त्याची चावी मागितली असता ती त्यांना देण्यात आली नाही. मग,पुन्हा कुलूप तोडणाऱ्याला आणण्यात आले. त्याने दार तोडले असता आत ईडीला हवे असलेले मुख्य संशयित अमर मुलचंदांनी,त्यांचा नोकर तसेच बबलू सोनकर दिसले.

Pimpri ED Raid News Update : पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलचंदानी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल
Odisha News : धक्कादायक : पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी आरोग्यमंत्र्यांवर झाडल्या गोळ्या अन् ..

दरम्यान, अमर यांनी त्यांच्या दोन्ही मोबाईलमधील सिमकार्ड काढून त्यातील डाटा डिलीट केला होता.तत्पूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमर कुठे आहेत,अशी विचारणा त्यांच्या कुटुंबाकडे केली होती.त्यावेळी त्यांनी माहिती नाही,असे सांगितले होते.मात्र, चार सीसीटीव्हीत अमर हे बंगल्यात आल्यानंतर बाहेर गेल्याचे दिसले नाही.म्हणून ईडीच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि त्यांनी बंद खोली उघडण्यास सांगितले होते.

मनी लॉंड्रिग कायद्यान्वये मुलचंदानींच्या घराची झाडाझडती घेतल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.त्यामुळे या अत्यंत कडक कायद्यान्वये अमर मुलचंदानींविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र,त्यासाठीचा पुरावा नष्ट झाल्याने त्यात तूर्तास अडथळा आला आहे.त्यामुळे त्यांचा पुढचा पवित्रा काय राहील,याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com