चंद्रकांतदादांच्या धमकीनंतर नाराज नगरसेवक आक्रमक ; जगताप, लांडगेंच्या कामाची करणार पोलखोल

पिंपरीतील भाजपचा नाराज नगरसेवक आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap ) आणि महेश लांडगेच्या (Mahesh Landge) कामाची पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहे.
Laxman Jagtap, Mahesh Landge & Chandrakant Patil
Laxman Jagtap, Mahesh Landge & Chandrakant PatilSarkarnama

पिंपरी : भाजप (BJP) सोडलेल्या पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) चार जणांना पश्चाताप कसा होईल, हे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत, असा धमकीवजा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी (ता.२३ ऑक्टोबर) दिला. त्यानंतरही शहर भाजपमधील नाराजी दूर होण्याचे संकेत नाहीत. उलट येत्या दहा दिवसात ती जाहीरपणे पुन्हा समोर येण्याचेच संकेत मिळाले आहेत. भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदच घेणार असल्याचे भाजपच्या एका नाराज नगरसेवकाने सरकारनामाला सांगितले.

Laxman Jagtap, Mahesh Landge & Chandrakant Patil
पिंपरीपाठोपाठ शरद पवार पुण्यातही लक्ष घालणार

दरम्यान, शहर भाजपमधील १५ ते २० नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. शहर कारभारी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap ) यांच्या चिंचवड मतदारसंघातील भाजपला पाठिंबा असलेले पाच अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास बारणे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर, दुसरी नगरसेविका टर्म संपताच तो करणार आहे. तर, भोसरी महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मतदारसंघातील तीन नगरसेवकांची नाराजी त्यांनी आमदारांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी न लावून स्पष्ट केली आहे. त्यातील दोघे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांच्या भेटीगाठीतून दिसुन आले आहेत.

या घडामोडी सुरू असतानाच नुकतेच भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या दोन्ही कारभारी आमदारांवर लेटरबॉम्ब टाकला. त्यांची चुकीची कामे, हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराचा फटका पक्षाला आगामी पालिका निवडणुकीत बसणार असल्याची तक्रार त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्याकडेच केली. त्याची त्यांनी दखल घेतली नाही. मात्र, काल शहरात आलेल्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर धमकीचा इशारा नाराजांना व त्यातही बंड करू पाहणाऱ्या नगरसेवकांना दिला आहे.

Laxman Jagtap, Mahesh Landge & Chandrakant Patil
`पवारांना लक्ष घालावे लागले, यावरून तुम्ही समजून घ्या`

पाटील यांनी इशारा देतानाच दुसरीकडे आपल्या आमदारांचेही कान टोचले. नगरसेवक नीट कसे राहतील हे सांगताना आमदार नीट कसे वागतील हे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत, असे सांगत त्यांनी आपल्या नगरसेवकांबरोबरच आमदारांनाही सूचक इशारा दिला आहे. मात्र, त्याचा परिणाम नाराज नगरसेवकांवर होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. कारण दोन्ही आमदारांच्या चुकीच्या कारभाराविरोधात आता पत्रकारपरिषदच घेणार असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.

भाजपचे सात नगरसेवक आम आदमी पक्षाच्या संपर्कात..

दरम्यान, गेल्या साडेचार वर्षात पक्षाने संधी तथा पालिकेत पद न दिल्याने भाजपच्या सात नगरसेवकांनी वेगळाच मार्ग चोखाळला आहे. ते दिल्लीत सत्ता असलेल्या `आप या राजकीय पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या दोन बैठका आतापर्यंत पुण्यात झाल्या आहेत. त्याला `आप`चे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी सरकारनामाशी बोलताना दुजोरा दिला. तसेच, त्यांनी यावेळी म्हणजे २०२२ ची पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुणे महापालिकेचीही निवडणूक आपला पक्ष लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे `आप` चाही पर्याय यावेळी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com