बंद `किऑक्स`मुळे सातबारा,फेरफार प्रतीसाठी पिंपरी-चिंचवडकर मारताहेत पुण्याचे हेलफाटे

Laxman Jagtap : आकुर्डी तहसील कार्यालयातील किऑक्स हे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्याची नागरिकांची शंका आहे.
MLA Lakshman Jagtap Latest News
MLA Lakshman Jagtap Latest NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन (किऑक्स) चालविण्यासाठी टेंडरच न काढण्यात आल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या ३० गावातील रहिवाशांना सातबारा, फेरफार नकला मागण्यासाठी पुण्याला हेलफाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे हे मशिन तत्काळ सुरू करावे, अशी मागणी चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्याकडे केली आहे. (MLA Lakshman Jagtap Latest News)

MLA Lakshman Jagtap Latest News
पुणे,पिंपरीतील अनधिकृत २१६ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द होणार

आमदार जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या ३० महसुली गावांचे १९३० ते २०१० या कालावधीतील स्कॅनिंग केलेले सातबारा आणि फेरफार उतारे यांच्या सत्यप्रती देण्यासाठी आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात क्युऑक्स मशीन बसवण्यात आले आहे. परंतु, ते गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या प्रती मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे.

कोर्ट कामासाठी, अपील व दावे दाखल करण्यासाठी सातबारा, फेरफार व नक्कल प्रतींची आवश्यकता असते. परंतु, किऑक्स बंद असल्यामुळे त्या मिळत नाहीत. त्यासाठी शेतकरी व नागरिकांना १५ ते २० किलोमीटर प्रवास करून पुण्यातील खडकमाळ येथील तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तेथे तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. तेवढा वेळ थांबूनही फेरफार मिळत नसल्याने खासगी एजंट गाठून नाईलाजाने त्याच्याकडून काम करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही बसतो. यातून आकुर्डी तहसील कार्यालयातील किऑक्स हे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्याची नागरिकांची शंका आहे. ते सुरु करण्याबाबत अनेकदा लेखी तक्रारी करूनही त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन वर्षे झाली दखल घेतलेली नाही. त्यामुळे मशील जाणूनबूजून बंद ठेवल्याची शंका आणखी बळावत आहे. ही शंका दूर करून शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आकुर्डीतील किऑक्स विनाविलंब सुरू करावे,अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

MLA Lakshman Jagtap Latest News
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची मुख्यमंत्र्यांची घोषणा; विधानसभेची मंजुरी

दरम्यान, सदर किऑस्क हे त्यासाठी चालक संस्थेची नेमणूक न झाल्याने बंद असल्याचे आकुर्डी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. हे मशिन चालवण्यासाठी चालक संस्था नेमण्याची गरज आहे. त्यासाठी टेंडर काढावे लागणार आहे. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. त्यामुळे त्यांना तशी विनंती करण्यात आली असल्याचे सांगून जगतापांच्या पत्र व मागणीची तातडीने दखल घेण्यात आली असल्याचे ढमाले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in