Pimpri Chinchwad : उद्योगनगरीतील गृहनिर्माण संस्थांच्या समस्या विधानसभेत; आमदार लांडगेंचा पुढाकार!

Mahesh Landage : चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशने आमदार लांडगेंचे आभार मानले.
Mahesh Landage Pimpri Chinchwad
Mahesh Landage Pimpri ChinchwadSarkarnama

Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या पाणी, पार्किंग, कचरा, एसटीपी, सीसीटीव्ही आदी मुलभूत सुविधांप्रश्नी भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी राज्य सरकारचे लक्ष लक्षवेधीव्दारे आज (ता.२९) विधानसभेत वेधले. या सर्व प्रश्नावर पुढील महिन्यात पुण्यात सर्व सबंधितांची बैठक घेण्याचे नगरविकास खात्याची विधीमंडळात जबाबदारी सोपविलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्य केले.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ५ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. नागरिकरणामुळे त्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिक सोसायटीधारकांना हमीपत्रात (करार) नमूद केल्याप्रमाणे सुविधा देत नाहीत. त्यामुळे सोसायाटीधारक आणि बांधकाम व्यावसायिक वाद निर्माण होतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा वाद लोकप्रतिनिधींकडे येतो. त्यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असे आमदार लांडगे यांनी सभागृहात म्हंटले.

Mahesh Landage Pimpri Chinchwad
Aurangabad : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेने उद्योगमंत्री सावंत यांच्या नावाने उकळले वीस लाख..

ओला कचरा उचलण्याबाबत एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युडीसीपीआर) अंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, २०१६ पूर्वी उभारण्यात आलेल्या बहुतेक सोसायट्यांकडे ओला कचरा जिरवण्याची यंत्रणा आणि जागा उपलब्ध नाही. दुसरीकडे पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाने ‘युडीसीपीआर’ नुसार ७० पेक्षा जास्त सदनिका आणि १०० किलोपेक्षा जास्त कचरा दररोज निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा आता उचलण्यास नकार दिल्याने प्रशासन आणि सोसायटीधारक असा नवा वाद निर्माण झाला आहे, याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. वास्तविक, सोसायटीधारकांना पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याने ‘युडीसीपीआर’ च्या नियमावलीत बदल करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि पार्किंग यासह अन्य सुविधा बांधकाम व्यावसायिक हमीपत्राप्रमाणे देत नाही. त्यामुळे निर्माण होणारे विवाद निराकरणासाठी सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशी स्वतंत्र यंत्रणा अथवा विभाग करुन कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर युडीसीपीआरच्या नियमावलीत बदल करण्याबाबत विभागाकडून पुण्यात सर्व विभाग आणि सचिव यांसह लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षनेते यांच्या बैठकीत पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

Mahesh Landage Pimpri Chinchwad
Winter Session : सहा महिन्यांनी ठाकरे-केसरकर आमने-सामने; काय म्हणाले उद्धव ठाकरे...

दरम्यान, शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या विविध अडचणींबाबत लांडगे यांनी विधीमंडळात आवाज उठवल्याबद्दल चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी महेशदादांचे लगेचच आभार मानले. पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक व पिंपरी चिंचवड मनपाचा बांधकाम विभाग यांच्या मिलीभगतमुळे सामान्य नागरिकांना घर घेतल्यावर नाहक त्रास सहन करावा लागत होता, असे ते म्हणाले.

विकसकाकडून बांधकाम आराखड्यामध्ये सतत बदल सदनिकाधारकांची सहमती न घेता नियमबाह्य बद्दल केले जातात. तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या बांधकाम विभागाकडून विकसकास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देताना गृहप्रकल्पाची पाहणी न करताच, ते दिले जातात. त्यावर फेडरेशनने आवाज उठवूनही न्याय मिळत नव्हता,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com