PCMC News|पिंपरी महापालिकेतील बदली व नियुक्ती नाट्य संपता संपेना

PCMC News| पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पिंपरी पालिकेतीलच उपायुक्त स्मिता झगडे (एलबीटी आणि सुरक्षा) यांची १३ तारखेला राज्य सरकारने नियुक्ती केली
PCMC News|
PCMC News|

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पिंपरी पालिकेतीलच उपायुक्त स्मिता झगडे (एलबीटी आणि सुरक्षा)यांची १३ तारखेला राज्य सरकारने नियुक्ती केली. मात्र,नऊ दिवसानंतरही कालपर्यंत (ता.२२) त्यांना नवीन जागी रुजू करून घेण्यात आले नाही. दरम्यान, राज्य सरकारनेच आपला पूर्वीचा आदेश फिरवून झगडेंची नियुक्ती रद्द करत तेथे वसई-विरार पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या नेमणुकीचा बदलीचा आदेश काल काढला. त्यांना, मात्र आज (ता.२२) लगेचच आयुक्त शेखरसिंह यांनी पदभार दिला.त्यामुळे नऊ दिवस रंगलेल्या या नियुक्ती व बदली नाट्याची चर्चा शहरभर सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असताना पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची पिंपरीत नियुक्ती झाली होती. मात्र,राज्यात सत्ताबदल होताच आघाडी सरकारने व त्यातही तत्कालीन उपममुख्यमंत्री अजित पवार यांनी आणलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या फडणवीस-शिंदे सरकारने केल्या. त्यातून अजित पवार यांना काहीअंशी शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दरम्यान,या बदल्यांचे नाट्य नंतर चांगलेच रंगले. ते अजूनही संपलेले नाही.

PCMC News|
भव्य सैनिकी शाळा बघून केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, सुधीर मुनगंटीवार म्हणजे लाजवाब..!

आय़ुक्त पाटील यांची गेल्या महिन्याच्या १६ तारखेला राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा साताऱ्याचे सीईओ शेखरसिंह आले आहेत.मात्र, एक महिन्यानंतरही पाटील नव्या पदावर रुजू झालेले नाहीत. त्यांच्यानंतर ढाकणे यांचीही या महिन्यात १३ तारखेला बदली झाली. त्यांच्या जागी झगडेंना नियुक्ती देण्यात आली होती. मात्र,त्यांना ती आयुक्तांनी कालपर्यंत दिलीच नाही. अखेरीस त्यांची नियुक्ती राज्य सरकारने काल रद्द करून त्यांच्या जागी जांभळेची बदली केली. त्याचा आदेश नगरविकास विभागाने काल काढला.

त्यानंतर,मात्र २४ तासात जांभळेंना आयुक्तांनी आज पदभारही दिला.त्यामुळे महिला अधिकाऱ्याला राजकीय दबावातून आय़ुक्तांनी पदभार दिला नसल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. कारण झगडेंच्या नियुक्तीला शहरातील एका वजनदार लोकप्रतिनिधींचा विरोध होता. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालून झगडेंची नियुक्ती रद्द केल्याचे समजले.एवढेच नाही,तर रिक्त अतिरिक्त आय़ुक्तपदी मर्जीतील अधिकारी आणला गेल्याचे ऐकायला मिळाले.दुसरीकडे पाटील यांच्याप्रमाणे ढाकणे हे ही नव्या जागी म्हणजे त्यांच्या मूळ रेल्वे सुरक्षा सेवेत हजर झाले नसल्याचे कळते.परिणामी पिंपरी पालिकेतील बदली व नियुक्ती नाट्य अद्याप संपलेले नाही.

दरम्यान, ढाकणेनंतर पिंपरी पालिकेतील आणखी दोन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्यातील सत्ताबदलानंतर त्यांनी स्वताहूनच आपली बदली करा,अशी विनंती केली आहे. त्यानंतर नवे आयुक्त हे अधिकारी पातळीवर खांदेपालट म्हणजे जबाबदाऱ्यांचे नव्याने वाटप करण्याचे संकेत मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com