Pimpri Chinchwad News : पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडचे पळालेले पाणी थांबले !

Pimpri Chinchwad water suply News : पिंपरी-चिंचवडकरांचे दिवसाआड पाणीही आजपासून बंद होणार होते,पण...
Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama

Pimpri Chinchwad News : तीस लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून (Pawana Dam) पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या साठ वर्षांपासून पवना धरण धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी आजपासून पाणी बंद आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या तोंडचे पाणीच पळाले होते.

Pimpri Chinchwad News :
Pradeep Kurulkar News: हनीट्रपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांना १५ मेपर्यंत 'एटीएस' कोठडी

मात्र, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याप्रश्नी येत्या १९ तारखेला पुण्यात जिल्हाधिकारी आणि सबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. त्यामुळे अगोदरच गेल्या साडेतीन वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडचे पाणी या पाणी बंद आंदोलनामुळे आज पळाले होते. मात्र,तूर्तास ते थांबले आहे. पण गेली ६० वर्षे पुनर्वसन रखडल्याने आक्रमक झालेले पवना धरणग्रस्त १९ तारखेनंतर पुन्हा हे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.

पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण पुनर्वसन साठ वर्षानंतरही झालेले नाही. त्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. चार एकर शेती मिळावी,अशी त्यांची एक प्रमुख मागणी आहे. तर, दोन एकरवर सरकार अडून बसले होते. दरम्यान, न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्याच्या पाच वर्षांनंतरही त्यांना देय असलेली जमिन देण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP News) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या नेतृत्वात आज पाणी बंद आंदोलन सुरु केले.

Pimpri Chinchwad News :
Karad News : शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बॅंक मॅनेजरवर गुन्हा दाखल होणार : शंभूराज देसाई

पवनानगरमधून (PawanaNagar) मोर्चा काढून ते धरणावर गेले. तेथील प्रवेशव्दाराला त्यांनी टाळे ठोकले. पालकमंत्र्यांनी फोनवरून बैठकीचे आश्वासन दिले. तरीही आंदोलक आंदोलनावर ठामच होते. अखेरीस ते स्थगित करण्याचे ठरले आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडचे पळालेले पाणी थांबले. आमदार शेळके यांनी विधीमंडळात (Maharashtra Assembly) हा प्रश्न मांडूनही लालफितीत तो अडकला आहे.

Pimpri Chinchwad News :
RSS News : चांगले, वाईट धंदे करणाऱ्या स्वयंसेवकांवर संघाने नजर ठेवावी!

दरम्यान, या आंदोलनाची चाहूल लागताच कालच (दि.८ मे ) पवना धरणातून अधिक पाणी सोडण्याची खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठा (Water Suply News) सुरळीत झाला. दरम्यान, सकाळी सुरु झालेले हे आंदोलन दुपारी मागे घेण्यात आल्यानंतर संध्याकाळचाही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यातील अडथळा दूर झाला. तसेच ऐन उन्हाळ्यात पाणीबंदचे शहरावरील संकटही तूर्तास टळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com