Pimpri Chinchwad News : 'एफआयआर' दाखल करण्यासाठी पोलिसांच्या पंटरने मागितले तब्बल 3 लाख!

Police Bribe : आता तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांच्या वतीने होतेय लाखो रुपयांची मागणी!
Pimpri Chinchwad News : Bribe
Pimpri Chinchwad News : Bribe Sarkarnama

Pimpri Chinchwad News : पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वसामान्य तक्रारदाराला मोठ्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात, यात नवीन काही नाही. पण, त्यासाठी आता पैसे आणि तेही लाखांत मोजावे लागत असल्याचे धक्कादायक प्रकरण पुणे जिल्ह्यातील पिंपरीतील सासवडे येथे समोर आले आहे.

सासवडे येथील एका कॉलेजचालकाविरुद्ध काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. ते या चालकाला ब्लॅकमेल करीत खंडणी मागत होते. म्हणून त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सदर कॉलेजचालकाने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Pimpri Chinchwad News : Bribe
Fadanvis : ‘ही’ योजना फसवी तर नाही ना, म्हणून काही महिला प्रवास करून बघत आहेत...

त्यावर गुन्हा (एफआयआऱ) नोंदविण्याकरिता सासवडचे पीआय घोलप व त्यांच्या वतीने अक्षय सुभाष माऱणे (वय २९) या खासगी व्यक्तीने (पोलिसांचा पंटर) तीन लाख रुपये लाच मागितली.त्याला गणेश बबनराव जगताप (वय ४०) या दुसऱ्या खासगी व्यक्तीने सहाय्य केले. म्हणून एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे युनिटकडे या कॉलेजचालकाने तक्रार दिली.तिची १३ तारखेला एसीबीने शहानिशा केली. त्यात मारणेने पीआय घोलप यांच्यासाठी तीन लाख रुपये मागितल्याचे व त्याला जगतपाने सहाय्य केल्याचे दिसून आले. म्हणून मारणे व जगताप या दोघांविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा आज नोंदवून त्यांना लगेचच अटक करण्यात आली.

Pimpri Chinchwad News : Bribe
Amruta Fadnavis News :अमृता फडणवीसांच्या आडून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न? पोलीस तपासात माहिती उघड

मात्र, लाच मागणारे पीआय घोलप यांना या लाचखोरीच्या गुन्ह्यात एसीबीने आरोपी न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सदर पीआयला एसीबीने पाठीशी घातल्याची आणि प्रत्यक्ष लाच घेतानाची कारवाई (ट्रॅप) न करता फक्त ती मागितल्याची कारवाई एसीबीने केल्याची चर्चा ऐकायला मिळाली. मात्र,आमच्या पडताळणीनुसार हा गुन्हा दाखल केला असून बाकीच्या बाबी तपासात निष्पन्न होतील, असा खुलासा पीआय घोलपला आऱोपी न केल्यामागे एसीबीच्या प्रवक्यांनी सरकारनामाशी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in