पालिकेची मुदत संपत आल्याने कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर ; दफनभूमीसाठीही नेमला सल्लागार..

पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) बुधवारी स्थायीच्या बैठकीत (Standing Committee) ११७ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
पालिकेची मुदत संपत आल्याने कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर ; दफनभूमीसाठीही नेमला सल्लागार..
PCMCSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत (Standing Committee) बुधवारी (ता.१२ जानेवारी) ११७ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर, गेल्या बैठकीत (ता.६ जानेवारी) ३०९ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायीने मान्यता दिली होती. दरम्यान, पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या साध्या, अतांत्रिक व सल्याची आवश्यकता नसलेल्या कामासाठीही नाहक सल्लागार नेमणूक करून त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या श्रीमंत पिंपरी पालिकेची ही अनिष्ट परंपरा पुढे चालूच आहे. शहरातील एका दफनभूमीच्या दुरुस्तीसाठीही त्यांनी आता सल्लागार नेमून त्याला या कामाच्या एकूण खर्चाच्या दोन टक्के कमिशन देण्याचा ठराव काल मान्य केला.

PCMC
FACT CHECK : पुण्याच्या प्रभागरचनेचा नकाशा फुटला?

दरम्यान, कोरानाची तिसरी लाट शहरात आल्याने स्थायीच्या सभा आता पुन्हा ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. त्यानुसार कालची सभा झाली. अशा सभेत चर्चा करता येत नाही. तसेच तांत्रिक अडथळाही येतो,अशा तक्रारी सदस्यांनीच यापूर्वी केलेल्या आहेत.वाढत्या कोरोनामुळे एकीकडे पालिकेत बैठका ऑनलाईन झाल्या.मात्र,त्याचवेळी कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी ही आता पुन्हा ऑफलाईन करण्यात आली आहे.म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पु्न्हा जुन्या पद्धतीनुसार मस्टरवर सही करून हजेरी लावावी लागत आहे. थंब इंप्रेशन व फेस रिडींगव्दारे ती तूर्त थांबविण्यात आली आहे.

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्यात अपेक्षित आहे. परिणामी या स्थायी समितीची मुदत संपत आली आहे. गतवेळी २०१७ ला एव्हाना म्हणजे ११ जानेवारीलाच आचारसंहिता लागली होती. त्यामुळे आता सुद्धा ती केव्हाही लागण्याची शक्यता आहे. फक्त कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने व अद्याप कच्चा प्रभाग आराखडा तयार न झाल्याने यावेळी निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. १३ मार्चला या सभागृहाची मुदत संपते आहे. त्यामुळे गतवेळी पालिका निवडणूक ही २१ फेब्रुवारीला होऊन २३ तारखेला निकाल लागला होता. त्यासाठी ११ जानेवारी २०१७ ला आचार संहिता लागली होती. पण, यावेळी ११ जानेवारी उलटून गेल्यानंतरही अद्याप कच्चा प्रभाग आराखडा तयार झालेला नाही. त्यात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. शिवाय कोरोनाची तिसरी लाटही आली आहे. त्यामुळे पालिका निवडणूक पुढे जाईल, असा सर्वच पक्षांचा होरा आहे.

PCMC
राज्यात सर्वाधिक Covid-19 पॉझिटिव्हीटी ठाण्यात तर सर्वात कमी या जिल्ह्यात..

दहावी, बारावीच्या परीक्षानंतर मे मध्ये ती होईल, असा अंदाज आहे. पण, सभागृहाची मुदत संपताच प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहतील. तोपर्यंतच स्थायीच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव धडाधड मंजूर करण्यास स्थायीने आता सुरवात केली आहे. त्यानुसार शहरात सात पाण्याच्या टाक्या बांधण्याचा ६४ कोटी रुपयांचा एकच सर्वात मोठा विषय काल मान्य केला गेला. अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. शहरातील कासारवाडी दफनभूमीतील सुधारणाविषयक कामासाठी मे. शिल्पी आर्किटेक्ट अॅन्ड प्लॅनर्स या सल्लागाराची नेमणूक करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in