पालिकेची मुदत संपत आली, तरी नगरसेवकांची टूरची हौस काही फिटेना

केरळ राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी हा अभ्यास दौरा असल्याचे सांगण्यात आले आहे.
pcmc
pcmc Sarkarnama

पिंपरी : लाखो रुपयांच्या जनतेच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नगरसेवकांचे अभ्यास दौरे हे सहलच ठरत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यावर चौफेर टीका होऊनही गेल्या पाच वर्षात देशातच नाही, तर परदेशातही नगरसेवकांच्या अशा अनेक टूरटूर (Tour) झाल्या आहेत.आता कहर म्हणजे मुदत संपल्यानंतरही काही नगरेसवक, अधिकारी आणि कर्मचारी हे केरळची ट्रीप या महिन्यात करणार आहेत.

pcmc
मोठी बातमी! राज्यातील 14 जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध शिथिल; इतर जिल्ह्यांना दिल्या महत्वपूर्ण सुचना

१३ मार्चला पालिकेची मुदत संपणार आहे. तरी जाता जाता एक टूर करण्याचे सत्ताधारी भाजपने योजले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या नगरसेविका,अधिकारी आणि कर्मचारी हे केरळ राज्यातील कुटंब श्री प्रकल्पाची पाहणी करायला जाणार आहेत.कोरोनामुळे श्रीमंत पिंपरी पालिकेच्या या दौऱ्यांना काहीसा ब्रेक लागला होता. आता कोरोनाचे सावट कमी होताच ही टूरटूर लगेच सुरु झाली आहे.महिला सक्षमीकरणात अग्रेसर असलेल्या केरळ राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी हा अभ्यास दौरा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, तो किती दिवस आहे,त्यात किती नगरसेवक, अधिकारी,कर्मचारी जाणार आहेत,त्यासाठी किती लाख रुपये खर्च येणार आहे हे, मात्र खूबीने दडविण्यात आले आहे. फक्त या दौऱ्याच्या खर्चाचा मान्यता द्यावी,एवढाच प्रस्ताव उद्याच्या (ता.४) स्थायी समिती बैठकीच्या अजेंड्यावर ठेवण्यात आला आहे.

pcmc
Video : अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही!

स्थायीची सभा ही साप्ताहिक असते.चार दिवसांपूर्वी ती २८ तारखेला झाली.त्यानंतर ती आठवड्याने म्हणजे सात मार्चला होणे अपेक्षित होते. तरी,ती चारच दिवसांत म्हणजे उद्या आयोजित करण्यात आली आहे.कारण पालिकेची म्हणजे स्थायीची सुद्धा मुदत येत्या १३ मार्चला संपते आहे. त्यामुळे त्याअगोदर शक्य तेवढे मलईदार विषय मंजूर करण्याचा सपाटा स्थायीने लावला आहे. त्यातून सात दिवसांनी नाही,तर चार दिवसांतच पुन्हा स्थायीची बैठक उद्या होत आहे.पुरेसे विषय नसतानाही ती आयोजित करण्यात आली आहे. फक्त सात म्हणजे आतापर्यंत गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी रेकॉर्डब्रेक विषय उद्या स्थायीच्या विषयपत्रिकेवर आहेत. मात्र, गेल्या बैठकीसारखे ऐनवेळी अजेंड्यापेक्षा जास्त विषय उद्या येऊ शकतात. गत बैठकीत ३६ विषय मंजूरीसाठी अजेंड्यावर होते.तर, ऐनवेळी पन्नास ते आले. त्यातून १८० कोटींचे विषय मंजूर झाले होते. नगरसेवकांच्या सहलीच ठरणारे अभ्यासदौऱ्याचे विषय विरोधी पक्षाचे सदस्यही मूग गिळून मंजूर करीत आहेत,हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com