PCMC News : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवडला झुकते माप, मात्र निष्ठावंतांना डावलल्याने नाराजी !

Pimpri Chinchwad News : महिलांना डावलल्याची चर्चा..
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News Sarkarnama

Pimpri Chinchwad News : भाजपची जंबो प्रदेश कार्यकारिणी आज (ता.३) जाहीर झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवडला यावेळी गतवेळपेक्षा झुकते माप देण्यात आले आहे. मात्र पक्षात नुकताच प्रवेश झालेल्यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने, शहरासह राज्यभरातील भाजपच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad News
Putin Drone Strike : ड्रोनहल्ल्यातून थेट पुतीनच्या घरावर स्फोट; रशिया देणार जशास तसे प्रत्युत्तर?

महिलांना तुलनेने कमी संधी या नव्या कार्यकारिणीत देण्यात आली आहे. तसेच एक पद, एक व्यक्ती या तत्वालाही हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे. कारण या नव्या नियुक्तीतून काहींकडे दोन-दोन पदे आली आहेत. त्यामुळे त्यांचा एका पदाचा राजीनामा पक्ष घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

दुसरीकडे संघटनकौशल्य असलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली ती नुकतेच पक्षात आलेले शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे, शिरूरच्या माजी आमदार जयश्री पलांडे आदींना लगेचच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आल्यामुळे, तसेच सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न झाला असला, तरी मातंग समाज मात्र वंचित राहिला आहे.

गत कार्यकारिणीत पिंपरी चिंचवडमधील चारजण होते. यावेळी ही संख्या दुप्पट झाली आहे. पावणेचारशे जणांच्या या जंबो कार्यकारिणीत ६४ कार्यकारिणी सदस्य आहेत. सदाशिव खाडे हे उद्योगनगरीतील एकमेव त्यात आहेत. १६ उपाध्यक्षांमध्ये दुसरे पिंपरी-चिंचवडकर आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे आहेत.

Pimpri Chinchwad News
Sakal-Saam Survey : अजित पवार भाजपसोबत गेले तर स्थिर सरकार मिळेल का? सकाळ-साम सर्व्हे काय सांगतो?

शहरातील शंकर जगताप, एकनाथ पवार, संतोष कलाटे, राजेश पिल्ले, अँड. सचिन पटवर्धन आणि अनुप मोरे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. खाडे हे गत कार्यकारिणीतही होते. त्या कार्यकारिणीत महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे या सध्या विधान परिषद सदस्या झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com