PCMC Water Supply : पिंपरी महापालिका, तुझा तुझ्यावरच भरवसा नाय का?

Pimpri-Chinchwad News| पावसामुळे नदीतील पाण्यात गढूळपणा वाढल्याने पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
PCMC
PCMCSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे अगोदरच अपुऱ्या पाण्याच्या तक्रारी असताना त्यात आता अस्वच्छ पाण्याचीही भर पडली आहे. परिणामी गॅस्ट्रोचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सावध झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन नागरिकांना आता केले आहे. त्यातून पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पालिकेचाच भरवसा नाही का, अशी विचारणा होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धऱणातील पाणीसाठा ८० टक्यावर गेला आहे. मात्र, पावसामुळे पवना नदीचे पाणी गढूळ झाले आहे.या नदीवरील बंधाऱ्यावरूनच धरणातून सोडण्यात येणारे पाणी पालिका उचलते. ते शुद्धीकरण करून पुरवते. दरम्यान, पावसामुळे हे गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतरही ते गढूळच येत आहे.त्यामुळे परवाच्या झालेल्या जनसंवाद सभेत पाणीपुरवठा स्वच्छ आणि योग्य दाबाने करा, अशी तक्रार रहिवाशांनी केली होती. त्यावर लगेचच पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंत्यांनी पत्रक काढले.

पालिका पुरवत असलेले पाणी पूर्णपणे योग्य असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. तरीही पावसामुळे नदीतील पाण्यात गढूळपणा वाढल्याने पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर त्यांचाच भरवसा नाही का, अशी विचारणा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in