नगरसेवक नसलेल्या पिंपरी काँग्रेसने केले दोन प्रजासत्ताकदिन कार्य्रक्रम अन् म्हणाले, भाजपा `चले जाव`

पिंपरी कॉंग्रेसच्या (Pimpri Congress) आजी, माजी शहराध्यक्षांच्या दोन गटांकडून दोन वेगवेगळे कार्यक्रम झाल्याने त्याची चर्चा होत आहे.
Pimpri Congress
Pimpri CongressSarkarnama

पिंपरी : प्रजासत्ताकदिन (Republic Day) बुधवारी (ता.२६ जानेवारी) देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नव्हते. येथे, तर या दिनानिमित्त कॉंग्रेसच्या (Congress) आजी, माजी शहराध्यक्षांच्या दोन गटांकडून दोन वेगवेगळे कार्यक्रम झाल्याने त्याची चर्चा झाली. एका सोहळ्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशातील भाजपची हुकूमशाही सत्ता घालविण्यासाठी सर्व देशवासियांनी आता भाजपा `चले जाव` चा नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी केले. तर, दुसऱ्या कार्यक्रमात माजी शहराध्यक्ष आणि पक्षाचे प्रदेश सचिव सचिन साठे (Sachin Sathe) यांनी देशातील लोकशाही सध्या धोक्यात आली असून ती टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज प्रतिपादित केली.

Pimpri Congress
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटीशांची जुलमी सत्ता घालविण्यासाठी `चले जाव` चा नारा ज्याप्रमाणे स्वातंत्र्याकरिता देण्यात आला. तसाच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशातील भाजपची हुकूमशाही सत्ता घालविण्यासाठी सर्व देशवासियांनी आता भाजपा चले जाव चा नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे कदम म्हणाले. पिंपरी येथे ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते.

संविधानामुळे मिळालेली लोकशाही भाजपाच्या सत्तेमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे ती चिरंतन टिकविण्यासाठी केंद्रातील भाजपाची हुकूमशाही सत्ता घालविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व देशवासियांनी आता ‘भाजपा चले जाव’चा नारा देण्याची गरज आहे. तरच आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहील, असे कदम म्हणाले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नेते राजाभाऊ भोंडवे, हिरा जाधव, सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल आदी उपस्थित होते.

Pimpri Congress
ते त्यांचे काम करतील आम्ही आमचे काम करत राहू

तर, देशातील लोकशाही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धोक्यात आली असल्याचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकशाही मानणा-यांनी आता ती टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साठे यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड असंघटीत कामगार कॉंग्रेसने आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी त्यांच्या हस्ते मिलिंदनगर, आंबेडकरकॉलनी, बौद्धनगर, भाटनगर, पत्राशेड आदी भागातील असंघटित कामगारांना ई-श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. आयोजक व शहर काँग्रेस असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष सुंदर कांबळे, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, घरेलू महिला कॉंग्रेस प्रदेश समन्वयक शितल कोतवाल, शहर कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुध्दीन शेख, ज्येष्ठ नेते संदेश नवले, विशाल कसबे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Pimpri Congress
मॅट्रीमोनी साइटवरील ओळख महागात, अडीचशे तरुणींची कोट्यवधींची फसवणूक व लैंगिक शोषण

दरम्यान, काही दिवसांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आल्या आहे. यासाठी पिंपरीतील सत्तेतील भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याबरोबरीने राष्ट्रवादी तर सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे. तर, शिवसेनाही जोर लावत असून मनसेही आपले नशिब अजमावून बघत असतांना ऐकेकाळी पिंपरी पालिकेत सत्तेत असलेली काँग्रेस मात्र, त्यांच्यातच गटतटात विभागली आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी पालिकेत काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आपले खाते उघडेल अशी आशा काँग्रेसजणांकडून लावली जात आहे. मात्र, त्याच्यात पडलेल्या गटातटावरुन हे कितपत शक्य होईल हे सांगणे अवघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com