आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांचे हातात हात!

महापालिका निवडणुकीच्या (PCMC Election) तोंडावर भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय 'सक्षम बूथ अभियान' सुरू केले आहे.
Mahesh Landge & Laxman Jagtap
Mahesh Landge & Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक ही तीन सदस्यीय पद्धतीने होणार असल्याचे जाहीर होताच, भारतीय जनता पक्ष (BJP) लगेच तयारीला लागला आहे. निवडणुकीत इच्छूकांना आधी पक्षबांधणाच्या कामात जोडणे सूरू केले आहे. प्रथम बूथ सक्षम करा, मग उमेदवारीसाठी विचार करू, असे पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छूकांना पक्ष नेतृत्वीने बजावले आहे.

Mahesh Landge & Laxman Jagtap
वाकडमध्ये पुन्हा झळकले फ्लेक्स : होय, मी रस्ता बोलतोय !

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय 'सक्षम बूथ अभियान' सुरू केले आहे. चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील बूथ बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासोबत आता पिंपरी विधानसभा मतदार संघात 'एक बूथ ३० युथ' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परवा (ता.३ ऑक्टोबर) प्रथम `चिंचवड` ची लक्षम बूथ' या अभियानाची आढावा बैठक स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली काळेवाडीफाटा येथे पार पडली. काल (ता.४ ऑक्टोबर) पिंपरी विधानसभा मतदारसंघाची बैठक शहर कार्यालयात घेण्यात आले

Mahesh Landge & Laxman Jagtap
पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला घरचा आहेर

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले. दोन्ही बैठकांना विद्यमान नगरसेवकांच्या जोडीने आगामी निवडणुकीसाठीचे इच्छूक आणि बुथप्रमुख हजर होते. प्रत्येक बूथप्रमुखाने तीस मतदारांची यादी करण्यास प्रदेशवरून सांगण्यात आले आहे. दोन्ही आमदार व शहराचे मुख्य सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनीही आपली यादी यावेळी सादर केली.

शहरातील तेराशे पैकी आठशे बूथप्रमुखांनीही यादी तयार केली आहे. पक्ष संघटन तथा बांधणीवरच या दोन्ही बैठकांचा भर होता. सक्षम बूथरचना करणाऱ्यांचाच आगामी पालिका निवडणुकीसाठी विचार केला जाईल, असा इशारा देत, शहराच्या दोन्ही कारभारी आमदारांनी इच्छूकांना आतापासूनच कामाला लावले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपचे 'टार्गेट' पिंपरी विधानसभा मतदारसंघ.

यावेळच्या महापालिका निवडणुकीला भाजपचे 'टार्गेट' पिंपरी विधानसभा मतदारसंघ राहणार आहे. कारण तेथे पक्षाचा आमदार नाही. म्हणून शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांनी पिंपरीत लक्ष घातले आहे. त्यासाठी आमदार लांडगेंनी आपल्या भोसरी मतदारसंघा आधी पिंपरीत बैठक घेतली. लांडगे आणि जगताप यांनी बूथ यंत्रणेसाठी लोक कसे जोडायचे? सुमारे ३० ते ३५ हजार लोकांच्या प्रभागामध्ये पक्षाने केलेली विकासकामे कशी पोचवायची? प्रत्येक हजार लोकांमागे ३० कार्यकर्त्यांचे जाळे कसे निर्माण करायचे? याबाबत मार्गदर्शन केले.

दोन्ही आमदारांनी एकत्रित लक्ष घातल्यामुळे पिंपरीत भाजपाची ताकद वाढणार आहे, असा दावा पक्षाने केला आहे. यासोबतच पिंपरी मतदारसंघात 'एक बूथ ३० युथ' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील काळात भाजप शहरात प्रभागस्तरावर बैठका घेणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com