Pimpri Chinchwad : ठाकरे गटानंतर 'आप'चाही पदाधिकारी निलंबनाचा बार निघाला फुसका!

Pimpri Chinchwad : ठाकरे गटानंतर `आप`चीही कारवाई ठरली औटघटकेची
Pimpri Chinchwad : Shivsena : AAP
Pimpri Chinchwad : Shivsena : AAPSarkarnama

Pimpri Chinchwad : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मनोहर पाटील यांचा अर्ज बाद होण्यामागे मोठे षडयंत्र आढळल्याने, त्यात सामील आपल्या एका पदाधिकाऱ्याला वर्षभरासाठी निलंबित, तर दुसऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची कारवाई १४ फेब्रुवारीला या पक्षाने केली होती. पण, ती आता मागे घेण्यात आल्याने ती ही शिवसेनेच्या चिंचवडमधीलच अशाच औटघटकेच्या आणि फुसक्या कारवाईसारखीच निघाली आहे.

Pimpri Chinchwad : Shivsena : AAP
Ravindra Dhangekar News: 'कसब्यात मुख्यमंत्री शिंदे पैसे वाटत फिरत होते' ; धंगेकरांचे खळबळ उडवून देणारे आरोप!

चिंचवडची जागा महाआघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचे ठरले. तरीही तेथे आघाडीतील ठाकरे गटाचे राहूल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तो कायम ठेवत निवडणूकही लढवली. त्यात त्यांना साथ देणाऱ्या महिला शहर संघटिका अनिता तुतारेंसह शहरातील आठ पदाधिकाऱ्यांची या पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी २० फेब्रुवारीला हकालपट्टीच केली. पण, ही कारवाई लगेचच मागे घेण्यात आली.

कारण, मूळ बंडखोर कलाटेंवर ही कारवाई होणे अपेक्षित असताना, ती त्यांच्यावर करण्यात आली नव्हती. म्हणूनच मूळ सोडून झाडाच्या फांद्या छाटण्याच्या शिवसेनेच्या या कारवाईची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या भांडणात मतविभागणी होऊन कलाटे निवडून येतील, या आशेतून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली नसल्याचीही कुजबूज सध्या ऐकायला मिळते आहे. कलाटेंचे हे दुसरे बंड आहे. गत २०१९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून ते लढले. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई झाली नव्हती.

Pimpri Chinchwad : Shivsena : AAP
Kasba By-Election : निकालाआधीच विजयाचा दावा : धंगेकर-रासनेंच्या कार्यकर्त्यांची फ्लेक्सबाजी!

शिवसेनेची कारवाई औटघटकेची ठरली असताना १४ तारखेला `आप`ने केलेली अशीच कारवाईही आता मागे घेण्यात आली आहे.ही कारवाई झालेल्या त्यांच्या दोन पदाधिकाऱ्यांवर, तर गंभीर आरोप होते.चिंचवडचे आप उमेदवार मनोहर पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर दहा सुचकांच्या सह्या न घेता तसेच एबी फॉर्म हा कोराच दिल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता.

याबाबत उमेदवारासह इतर पदाधिकाऱ्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे आणि प्रदेश सचिव धनजंय शिंदे यांच्याविरुद्ध लेखी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत बेंद्रे यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात येऊन शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची कारवाई पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी आणि प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी केली होती.

दरम्यान, अर्ज बाद झाल्याची विचारणा करणाऱे पक्षाचे शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार यांना निवडणूक कार्यालयातच सर्वांसमोर बेंद्रेंनी मारहाण केली होती. या प्रकरणातून पिंपरी-चिंचवड `आप` मधील गटबाजीही समोर आली होती. पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राठोड यांनी जळगाव येथून बोलताना `सरकारनामा`ला आज सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com