Pimpari News : हिंदूविषयी वादग्रस्त वक्तव्य : कॉंग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

Pimpari : "हिंदू हा शब्द भारतीय नसून पर्शियन आहे. त्याचा अर्थ अत्यंत घाणेरडा असा आहे."
Pimpari News
Pimpari NewsSarkarnama

पिंपरी : हिंदू हा शब्द भारतीय नसून पर्शियन आहे. त्याचा अर्थ अत्यंत घाणेरडा असा आहे. तरीही तो आमच्यावर का लादला जातो, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी नुकतेच केले होते. त्याचे पडसाद आज पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. शहर भाजपने जारकीहोळी यांच्याविरुद्ध आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले

काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जारकीहोळीच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे निवेदन काढले. या विधानामुळे पक्षात एकाकी पडल्याचे लक्षात आल्यावर जारकीहोळींनी दोन दिवसानी माफी मागितली. तरी त्यांच्या वक्यव्यावरून उठलेला वादळ, अद्याप शमलेले नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त वेगवेगळ्या प्रार्थनास्थळांत सध्या पूजाअर्चा करीत आहेत. ज्या कर्नाटकातून ते यात्रा करून आले आहेत, तेथील काँग्रेस नेते जारकीहोळींनी हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने, सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला.

Pimpari News
Eknath Shinde : आम्ही '50 खोके' घेणारे नाही, '200 खोके' देणारे..

धर्मवीर उपाधीसाठी छत्रपती संभाजी महाराज लायक नाहीत, अशी मुक्ताफळेही जारकीहोळींनी बेळगाव जिल्ह्यात निपाणीत उधळली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी मतदारसंघात मोशी येथे शंभूसृष्टी उभारत असलेले शंभू्प्रेमी भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर पक्ष कार्यालयासमोर जारकीहोळींविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले.

Pimpari News
Himachal Election : हिमाचलमध्ये सत्ता बदलणार की प्रथा? 412 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

यावेळी शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे तसेच राजेश पिल्ले, विलास मडेगिरी, संकेत चोंधे, अजय पाताडे, संजय परळीकर आदींनी त्यात सहभाग घेतला. हिंदू धर्माबाबत आम्हाला अभिमान असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीद्वारे जारकीहोळींच्या बेजबाबदार आणि अवमानकारक व्यक्तव्याबद्दल शिवप्रेमी तरुणांमध्ये संताप आहे,असे आमदार लांडगे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in