मराठा समाजाला भडकावणारा पीआय बकाले निलंबित; खातेनिहाय चौकशी सुरु

Police : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते
Police
Policesarkarnama

पिंपरी : मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव (Jalgaon) जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) पोलिस निरीक्षक (पीआय) किरणकुमार भगवानराव बकाले (Kiran Kumar Bakale) याला नाशिक रेंजचे स्पेशल आयजी बी. जी. शेखर यांनी तडकाफडकी आज निलंबित केले. त्यांच्या या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या बेजबाबदार गैरवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस (Police) खात्याने तातडीने हे पाऊल आज उचलले.

दरम्यान, जळगाव एलबीच्या अंमलदाराबरोबरच्या बकालेच्या या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी, तर बकालेला बडतर्फच करण्याची मागणी केली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही काल बकालेचे तातडीने निलंबन व्हावे, असे ट्विट केले होते. पोलिस अधिकाऱ्याने एखाद्या समाजाविषयी असा आकस ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे त्यांनी त्यात म्हटले होते. त्यामुळे अशा प्रवृत्तीला पोलिस खात्यातून हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली होती.

Police
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला ईडीची नोटीस

बकालेचे निलंबन करून त्याची आयपीएस अधिकाऱ्यामार्फत खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. जातीयवादी व्यक्ती आणि प्रवृत्तींना पोलिस दल कधीही पाठीशी घालणार नाही, असा निर्वाळा जळगाव जिल्ह्याचे एसपी डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिला आहे. त्यांनीच तातडीने बकालेविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव आपल्या वरिष्ठांना दिला होता. त्यांनी मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

Police
Shivsena : जावयाला कंत्राट मिळवून दिल्याचे आरोप होताच भुमरेंच्या मदतीला सत्तार धावले..

कारण बकालेची ऑडिओ क्लीप व्हायरल होऊन त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. १ नोव्हेंबर २०२० पासून जळगाव एलसीबीत तो कार्यरत होता. पीआय दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदार पदावरील अधिकाऱ्याचे हे अत्यंत गंभीर व बेजाबदार गैरवर्तन असल्याचे त्याच्या निलंबन आदेशात स्पेशल आयजींनी म्हटले आहे. त्यामुळे समाजात चुकीचा मेसेज जाऊन पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in