आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला

या हल्ल्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला
Petrol bomb attackSarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे भाऊ  शंकर जगताप यांच्या  पिंपळे गुरव येथील कार्यालयावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २३ नोव्हेंबर) दुपारी घडली. या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. दरम्यान, या हल्ल्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. (Petrol bomb attack on MLA Laxman Jagtap's brother's office)

Petrol bomb attack
निष्ठावंत नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार चव्हाण म्हणाले...

दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात तरुणांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशने दोन पेट्रोल बॉम्ब फिरकवले होते. त्यातील एक पेट्रोल बॉम्ब ऑफिसवर पडला असून दुसऱ्या पेट्रोल बॉम्बचा ऑफिसपासून काही अंतरावरच  स्फोट  झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झाला नसून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा पोचला आहे. पेट्रोल बॉम्ब स्फोटानंतर आरोपी तरुण दुचाकीवरू पसार झाले आहेत.

Petrol bomb attack
अजितदादा कोकणच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीला मोठा झटका

दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पिंपळे गुरुव येथे कार्यालय आहे. याच कार्यालयावर आज पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. या हल्ल्यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in