Pune News : पुण्यात शासकीय कार्यक्रम घ्यायचाय...?; मग पालकमंत्र्यांची परवानगी हवीच!

सर्व शासकीय कार्यक्रमांसाठी पालकमंत्र्यांना आमंत्रित करणे, त्यांना व्यासपीठावर राज्य शिष्टाचाराप्रमाणे योग्य स्थान देणे, निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव राजशिष्टाचाराप्रमाणे प्रसिद्ध करणे आदी बाबींची काळजी घेण्याचे या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

बारामती : भविष्यात पुणे (Pune) जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम घ्यायचा असेल, तर पालकमंत्र्यांच्या (guardian minister) कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी (Collector) डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. सर्व शासकीय कार्यालयांना याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (permission of guardian minister is required for government program in Pune district!)

राज्यात सत्तांतरानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले आहे. सध्या ते राज्य मंत्रीमंडळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. कोथरूडचे प्रतिनिधीत्व करणारे चंद्रकांतदादा हे भाजपमधील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अगोदर चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्षही होते.

Chandrakant Patil
BJP News : भाजपच्या बड्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा दुरावा

राज्य सरकारच्या निधीमधून ज्या कामांची उद्‌घाटने किंवा भूमिपूजन अथवा तत्सम कार्यक्रम आयोजित करायचे असतील, तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊनच आता हे कार्यक्रम आयोजित करावे लागणार आहेत.

Chandrakant Patil
Gram Panchayat Election : भ्रष्टाचार करणार नाही, कामांचे कोणतेही कंत्राट घेणार नाही; भावी गावकारभाऱ्यांनी घेतली शपथ

दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सर्व शासकीय कार्यक्रमांसाठी पालकमंत्र्यांना आमंत्रित करणे, त्यांना व्यासपीठावर राज्य शिष्टाचाराप्रमाणे योग्य स्थान देणे, निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव राजशिष्टाचाराप्रमाणे प्रसिद्ध करणे आदी बाबींची काळजी घेण्याचे देखील या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

Chandrakant Patil
Nabam Rebia Case : नाबाम रेबिया खटल्यातील हा मुद्दा शिवसेनेसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता

पालकमंत्र्यांच्या कार्यालयास न कळविता अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी कोणताही शासकीय कार्यक्रम पूर्वपरवानगीशिवाय आयोजित केल्यास त्याला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, अशा सूचना देखील या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत.

Chandrakant Patil
Thackeray Vs Shinde : सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिवसेनेचा होमवर्क कमी : उज्ज्वल निकम यांचे निरीक्षण

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय शासकीय निधीतून होणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना एका पत्राद्वारे दिल्या आहेत. आता भविष्यात पुणे जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर त्यास पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी बंधनकारक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in