पुणे जिल्हा बँक : हवेलीतील मैत्रीपूर्ण लढतीमध्ये म्हस्केंचा पराभव; विकास दांगटांची बाजी

PDCC bank election : राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती.
PDCC Bank Election Haveli Tehsil

PDCC Bank Election Haveli Tehsil

Sarkarnama

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC bank election) ७ जागांवरील आज मतमोजणी होत आहे. यात मुळशीनंतर हवेलीचा दुसरा निकाल हाती आला आहे. हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना (Prakash Mhaske) पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा ११ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते. (PDCC Bank Election Haveli Tehsil)

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर ७ जागांसाठी २ तारखेला मतदान पार पडले होते. यात हवेली तालुका मतदारसंघातून प्रकाश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास दांगट (Vikas Dangat) हे एकमेकांविरोधात रिंगणात होते. म्हस्के हे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते आहेत. मात्र त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे यावर उपाय म्हणून पक्षाने याठिकाणी मैत्रीपुर्ण लढत जाहिर केली होती.

<div class="paragraphs"><p>PDCC Bank Election Haveli Tehsil</p></div>
पुणे जिल्हा बँक : मुळशीत कलाटेंना धक्का, राष्ट्रवादीच्या चांदेरेंचा गुलाल

दांगट हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. येथून ते दोनदा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. तसेच २००९ मध्ये मनसेचे रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते अपयशी झाले. नंतर २०१७ त्या महापालिका निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता जिल्हा बॅंकेसाठी त्यांनी कंबर कसली आणि आज विजयही संपादन केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com