भाजपला इंदौर पॅटर्न भावला; आता थेट क्रमांक एकचे लक्ष्य

पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांनी इंदौरचा एक जुलैला दौरा केला.
भाजपला इंदौर पॅटर्न भावला; आता थेट क्रमांक एकचे लक्ष्य
BJP

पिंपरी : स्वच्छतेत पिंपरी-चिंचवड हे सध्या देशात २४ व्या क्रमाकांवर आहे. त्याअगोदरच्या वर्षात ते ५२ व्या नंबरवर होते. आता ते स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात अग्रस्थानी आणण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पालिकेच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त सोडला आहे. त्यासाठी देशामध्ये स्वच्छतेत चार वर्षे एक नंबरवर असलेल्या मध्यप्रदेशातील इंदौर शहरातील स्वच्छतेचा पॅटर्न आता पूर्ण पिंपरीत राबवला जाणार आहे.

सोमवारी (ता.११) पिंपरी पालिका आपला  ३९ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त मंगळवारी (ता.१२) स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर ऊषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले. सध्या शहरातील पाच प्रभागांमध्ये इंदूरच्या धर्तीवर कचरा विलगीकरण व संकलन करण्यात येत असून त्याची व्याप्ती आता परवापासून (ता.१२) शहरभर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

BJP
भाजपचा दे धक्का; जम्मूतील दोन बडे नेते पक्षाच्या वाटेवर

वर्धापनदिनानिमित्त देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन पाहिलेल्या शहरवासियांचा पालिका खास सत्कारही करणार आहे. म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी किमान दहा वर्षे वय असलेल्यांचा स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा नागरी सत्कार केला जाणार आहे. अशा ८५ वयापुढील शंभर व्यक्तींची लगेच नावनोंदणीही झाली आहे. तर, दोन दिवसांत हा आकडा दोनशे पार करेल,असा विश्वास ढाके यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

देशात इंदौर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात एक नंबरवर आहे. त्यामुळे पिंपरी पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांनी इंदौर १ जुलैला दौरा केला. तेथील कचरा विलगीकरणची पाहणी केली.त्यानंतर आपल्या शहरात पाच प्रभागातील कचरा विलगीकरणाचे प्रायोगिक तत्वावर काम इंदूरच्याच संस्थेला पिंपरी पालिकेनेही दिले. आता त्याची व्याप्ती शहरभर वाढवली जाणार आहे, असे ढाके म्हणाले. पाच-सहा महिने कचरा विलगीकरणासाठी प्रथम समुपदेशन करू. त्यानंतरही कचरा वेगवेगळा न करता एकत्र दिला, तर तो देणाऱ्याला दंड करू. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याविरुद्धही अशीच कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ढाके यांनी दिला आहे.

BJP
डच्चू दिल्यानंतर वरूण गांधींचा विरोधी सूर; म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी...

इंदूरमध्ये ओला, सुका व घातक अशा तीनप्रकारे नाही, तर ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक अशा सहाप्रकारे वर्गीकरण करण्यात येतो. प्रत्येक घरामधून वरीलप्रमाणे ६ प्रकारामध्ये विलगीकरण असल्याशिवाय कचरा स्विकारण्यात येत नाही. कचरा संकलनासाठी नियुक्त असलेल्या वाहनांचे मार्ग व वेळ कधीही बदलण्यात येत नाही. निवासी परिसरामध्ये वाहनांचे गट व  वेळ निश्चित आहे. संपूर्ण शहर कचराकुंडी विरहित आहे. शहरामध्ये हॉकर्सकरिता ठराविक जागा निश्चित करण्यात आली आहे. तेथील कचरा सबंधित हॉकर्समार्फत त्वरित उचलण्यात येतो. अस्वच्छता आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते.

शहरामध्ये झाडलोट कामकाज हे तीन शिफ्टमध्ये करण्यात येते. निवासी परिसरात २ वेळा व व्यापारी परिसरात ३ वेळा झाडलोट होते. यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करण्यात येत असून केवळ रात्रपाळीमध्येच मुख्य रस्त्यांची सफाई केली जाते. जेणेकरुन सकाळी शहरामध्ये स्वच्छता दिसून येते. पण हा कचरा विलगीकरणाचा इंदूर पॅटर्न पिंपरीत यशस्वी होईल, की नाही याविषयी जाणकारच साशंक आहेत. कारण सात वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून तो तसा स्वतंत्र घंटागाडीत द्यावा म्हणून शहरवासियांना काही कोटी रुपये खर्चून घरटी दोन बकेट तथा डस्टबीन देण्यात आल्या होत्या.

BJP
चिपी विमानतळाची थेट पंतप्रधान मोदींनी घेतली दखल अन् म्हणाले...

त्यानंतरही गेल्या सात वर्षात कचरा विलगीकरण झालेले नाही. कचरा एकत्रच सध्या टाकला जात आहे. तो तसाच घेतलाही जात आहे. त्यामुळे दोन प्रकारे कचरा वेगळा न ठेवणारे पिंपरी-चिंचवडकर तो सहा प्रकारे वेगळा ठेवून तो तसा देतील का याविषयी शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याविषयी जाणकार साशंक आहेत. दरम्यान, दिलेल्या डस्टबिनचा वापर रहिवाशांनी इतर कामासाठीच सुरु केल्याचे आढळून आले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in