PCMC News : शेखरसिंह यांनी साताऱ्यानंतर आता पिंपरी महापालिकेतही बनवली स्वत:ची टीम

शेखरसिंह यांच्यानंतर साताऱ्याहून आलेले थोरवे यांची गेल्या महिन्यातील २१ तारखेची बदली ही वादात सापडली आहे.
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama

PCMC Politics : चार महिन्यांपूर्वी (१८ ऑगस्ट) साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्याशी मेतकूट असलेले साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांचीदेखील पदोन्नती होऊन पिंपरी महापलिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून गेल्या महिन्यात (ता.२६) बदली झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी पालिकेत प्रशासन अधिकारी तथा प्रभारी क्षेत्रीय अधिकारी म्हणूनही अमित पंडीत हे सातारा जिल्ह्यातूनच आज रुजू झाले. अशा पद्धतीने गेल्या चार महिन्यात तीन अधिकारी हे साताऱ्यातून पिंपरी पालिकेत आल्याने शेखरसिंह यांनी साताऱ्यानंतर आता पिंपरी पालिकेतही आपली टीम तयार करायला सुरवात केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान,पंडीत यांना यांच्याकडे लगेचच ब क्षेत्रीय कार्यालय अधिकारी (सहाय्यक आय़ुक्त)म्हणून अतिरिक्त पदभारही आय़ुक्तांनी आज सोपविला.अगोदरच्या ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख या ही प्रभारीच होत्या.मात्र,त्यांचा अपघात झाल्याने त्या सध्या रजेवर आहेत.म्हणून १२ डिसेंबरला पिंपरी महापालिकेत बदली होऊन १६ डिसेंबरला हजर झालेले वडूज (जि.सातारा) नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंडीत यांच्याकडे देशमुख यांची महत्वाची जबाबदारी व पद देण्यात आले असल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागातून सांगण्यात आले. मात्र,शेखरसिंह यांच्यानंतर साताऱ्याहून आलेले थोरवे यांची गेल्या महिन्यातील २१ तारखेची बदली ही वादात सापडली आहे.

Pimpri-Chinchwad
Shivshakti Bhimshakti : 'शिवशक्ती-भीमशक्ती' ची चर्चा सकारात्मकतेच्या पुढे जाणार का ?

कारण त्यांच्या बदलीचा आदेश हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागावर अतिक्रमण करीत तो भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्याने काढला.त्यामुळे तो वादात सापडला.त्यात पिंपरी पालिकेतील तीन अतिरिक्त आय़ुक्तपदांसाठी चार अधिकारी झाले.त्यातील एकाने (स्मिता झगडे) राज्य प्रशासकीय लवादात (मॅट) धाव घेतली. राज्यात सत्ताबदल होताच अजित पवार यांनी आणलेले पिंपरी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्यानंतर अतिरिक्त आय़ुक्त विकास ढाकणे यांचीही नव्या शिंदे-फडणवीस सरकारने तडकाफडकी मुदतपूर्व बदली केली. पाटलांच्या जागी १८ ऑगस्टला शेखरसिंह सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह आले.तर ढाकणेंच्या जागी पिंपरी पालिकेतील उपायुक्त झगडेंची पदोन्नतीवर नियुक्ती नगरविकास विभागाने सप्टेबरमध्ये केली.

मात्र,आय़ुक्त शेखरसिंह यांनी राजकीय दबावातून त्यांना तीन आठवडे नियुक्तीच दिली नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्या बदली व अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्तीचा आदेश नगरविकास विभागाने फिरवला अन अतिरिक्त आय़ुक्तपदी वसई-विरार पालिकेचे प्रदीप जांभळे-पाटील यांची सप्टेंबरमध्ये बदली केली.त्यांना लगेच आय़ुक्तांनी पदभार दिला.त्यामुळे नाराज झगडेंनी मॅटमध्ये धाव घेतली.यामुळे अतिरिक्त आयुक्त पद नियुक्तीचा तिढा होऊन शेखरसिंह यांच्या मर्जीतील थोरवे हे बदलीनंतर महिना उलटूनही अद्याप पिंपरीत हजर झालेले नाहीत.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल,असा अंदाज आहे.त्यातून तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असलेले पालिका सेवेतील अधिकारी उल्हास जगताप यांना प्रभारी पद सोडावे लागेल,अशी चर्चा आताच सुरु झालेली आहे.दरम्यान,`मॅट`ने झगडेंच्या बाजूने निकाल दिला,तर अतिरिक्त आयुक्त पद नियुक्तीत मोठा उलटफेर पिंपरी पालिका प्रशासनात पहायला मिळणार मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com