PCMC : पवारांनी आणलेल्या पालिका आयुक्तांच्या आदेशाला शिंदे सरकारच्या आयुक्तांकडून केराची टोपली

PCMC : आठवड्यातील भेटीच्या दिवसांची संख्या चारहून तीनवर कमी केली
 PCMC
PCMC sarkarnama

पिंपरी : महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार जाऊन तेथे शिंदे-फडणवीसांचे (बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप) सरकार शंभर दिवसांपूर्वी आले. त्यांनी पूर्वीच्या सरकारने सर्व निर्णय फिरवण्याचा धडाका लावला आहे. एक, तर ते रद्द केले वा त्याला स्थगिती दिली. (PCMC news update)

पिंपरी-चिंचवड महापालिकेतही (PCMC) नव्या सरकारने आणलेले नवीन आयुक्त शेखरसिंह (Shekhar Singh) यांनी जुने आयुक्त राजेश पाटील यांच्या नागरिकांशी सबंधित एक महत्वाच्या निर्णय काल (ता.१) बदलला. त्याचा फटका पिंपरी-चिंचवडकरांना बसणार आहे.

पालिकेत सहा दिवसांचाच आठवडा आहे. पूर्वीचे आयुक्त आठवड्यातील चार दिवस सायंकाळी चार ते सहा या वेळेत हे अभ्यांगत आणि नागरिकांना भेटत होते. अर्जंट काम असेल,तर ते कधीही भेटत असत. पण, पाटील गेले. शेखरसिंह आले. त्यांनी येताच काही अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत फेरबदल केले. आता थेट नागरिकांशी सबंधित भेटीच्या पुर्वीच्या आदेशातही त्यांनी काल बदल केला.

आठवड्यातील भेटीच्या दिवसांची संख्या चारहून तीनवर कमी केली. ते आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. समाधानाची बाब ही की त्यांनी भेटीची वेळ एक दिवसाने कमी केली असली, तरी ती प्रत्येक दिवशी एका तासाने म्हणजे एकूण तीन तासांनी ती वाढवली आहे.

महापालिकेशी संबंधित कामकाजाकरीता नागरिक आयुक्तांकडे दररोज मुख्य प्रशासकीय भवनात येतात. कामकाजाची व्याप्ती,प्रसंगानुरूप संबंधित अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्यासोबत बैठकांचे आयोजन,अत्यावश्यक काम त्यांच्याकडे यावेळी चालू असते. परिणामी भेटीसाठी आलेल्यांना आयुक्त यांच्याशी भेटणे शक्य होत नाही. त्यांना तिष्ठत रहावे लागते. त्याचा विचार करून त्यांना भेटण्याची वेळ यापूर्वीचे आय़ुक्त पाटील यांनी आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार,शुक्रवार अशी चार दिवस सायंकाळी चार ते सहा अशी निश्चित केली होती.

राज्यातील सत्ताबदलानंतर पिंपरी पालिका सर्वोच्च प्रशासनातही तो लगेच झाला. आयुक्त पाटील यांची बदली होऊन तेथे शेखरसिंह आले. त्यांनीही नव्या राज्य सरकारचा कित्ता गिरवण्यास सुरवात केली आहे.

पूर्वीच्या आयुक्तांच्या भेटीच्या वेळेत बदल करीत त्यांनी ती आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशी केली आहे. मात्र काही प्रसंगी आयुक्त अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय, मुंबई अथवा पालिकेच्या मासिक सभा, स्थायी समिती सभा, विधी समिती सभा याकरीता सभागृहात असतात. त्यामुळे अशा प्रसंगी ते नागरिकांना वरील ठरवून दिलेल्या वेळेतही भेटण्यास उपलब्ध होऊ शकणार नाहीत, याची नोंद देखील नागरिकांनी घ्यावी, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पिंपरीच नाही,तर राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. त्यामुळे पालिकेची मासिक सभा,स्थायीची साप्ताहिक सभा व इतर समित्यांच्या पाक्षिक सभा होत नाहीत. पुढील काही महिने त्या होण्याची शक्यताही दिसत नाही. दुसरीकडे नगरसेवकांची मुदत संपल्याने त्यांच्याकडून जनतेची कामे होण्यास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नागरिक प्रशासनाकडे धाव घेत आहेत.

 PCMC
Parambir Singh : परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; रात्री उशिरा खलबतं !

स्थानिक प्रभाग क्षेत्रीय पातळीवर काही प्रसंगी त्यांना दाद मिळत नसल्याने त्यांना मुख्यालयात आयुक्तांना भेटण्यासाठी आता अधिक वेळा यावे लागते आहे. अशा स्थितीत आयुक्तांनी दररोजच सायंकाळी दोन तास जनता दरबार घ्यावा, अशी पिंपरी-चिंचवडकरांची रास्त मागणी आहे. त्याचा प्रशासकांनी विचार करावा,असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व मारुती भापकर म्हणाले. तर, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या भेटीसाठी वेळ निश्चीत केली असून त्यामुळे त्यांची सोय होईल, तसेच मलाही इतर वेळेत माझी कामे मार्गी लावता येतील, असे आयुक्त शेखरसिंह यावर 'सरकारनामा' शी बोलताना म्हणाले. अर्जंट काम असेल, तर मला कधीही भेटता येऊ शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com