Chandrashekhar Bawankule : पवारांचा राजीनामा ही तर नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Sharad Pawar : अजित पवार आणि भाजपमध्ये कसलाही संपर्क नव्हता
Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar, Chandrashekhar BawankuleSarkarnama

Maharashtra Politics : अजित पवार यांचा बरोबर गेल्या चार महिन्यापासून माझा संपर्क झालेला नाही. किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत. अजित पवार यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमध्ये भाजपचा कुठलाही डाव नव्हता.

दरम्यान, शरद पवार हे राज्यातील अनेक शिक्षण आणि सहकारी संस्थाच्या घटना बदलून त्यांचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार दुसऱ्याला कसे होऊ देतील? राष्ट्रवादी पक्षात राजीनाम्यावरून तीन दिवस फक्त नौटंकी झाली, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Pune Municipal Corporation: मिळकतकराची 40 टक्क्यांची सवलत हवी असेल तर 'हे' करावं लागेल!

पुणे दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी सोमवारी (ता. ८) कसबा मतदारसंघातील (Pune) बूथ प्रमुखांचा मेळावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवार यांच्यावर टीका केली. यावेळी घराणेशाहीवरून बावनकुळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला. बावनकुळे म्हणाले, "लोकशाही कशी असते हे पाहायचे असेल तर भाजपकडे सर्वांनी पहावे. दुसऱ्या पक्षात केवळ घराणेशाही आहे, लोकशाही नाही. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना दुसऱ्यांना मोठे करायचे नाही हे सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे."

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
BJP News : 20 मे पूर्वीच होणार भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड; काय असेल वयोमर्यादा? बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले

कसबा मतदारसंघासाठी ५१ टक्क्यांची लढाई करण्याची सूचना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी कार्यकर्त्यांना केली. ते म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. तीन दशकानंतर येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्याने त्याची राज्यभर चर्चा झाली. यापुढे कितीही पक्ष एकत्र आले तरी आपण ५१ टक्क्यांची लढाई केली पाहिजे. त्यासाठी पन्नास प्रमुख, बूथ प्रमुखांसह सर्वांनी मेहनत करावी. घर चलो अभियानाच्या माध्यमातून, सारथी ॲप नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ६० हजार नागरिकांशी संपर्क साधा."

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Chitra Wagh News : चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना आवाहन; म्हणाल्या, "राजकिय..."

कर्नाटक राज्यात (Karnataka) भाजप (BJP) निवडून येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडून येईल. बाकी कोणाची आम्हाला गरज नाही. भाजप हा कमळा चिन्हाच्या समोर कोणतीही तडजोड करत नाही. मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची कायमच भूमिका आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in