पवार म्हणाले;...पण ते काही आम्हाला जमलं नाही

विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

पुणे : पुण्यात निवडणुकीच्या रिंगणात अनेकवेळा अनेक जागा आम्ही जिंकल्या. एकदा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) कसब्यातून उभे राहिले. आम्ही ठरवलं त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवायचं. पण ते काही आम्हाला जमलं नाही आणि ते निवडून आले, अशी आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात सांगितली.

Sharad Pawar
एका महिन्यात 50 भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; सोमय्यांचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी लिहिलेल्या 'हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार बोलत होते. विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते. राजकीय आठवणी, कोपरखळ्या, मिश्‍किल टीका आशा मोकळ्या वातावरणात कार्यक्रम रंगला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘‘ सारेच पक्ष निवडून येण्यासाठी आपापल्या पातळ्यांवर काम करीत असतात. पण मला अजून लक्षात आलं नाही. गिरीश बापट कुठेही उभे राहतात आणि निवडून येतात.बापटांच्या एका निवडणकीत त्यांच्यावर आमचे विशेष लक्ष होते. मात्र. ते काही आम्हाला जमलं नाही आणि ते निवडून आलेच.’’

Sharad Pawar
मला माहित नाही हे अयोध्येत जाऊन काय करतात; जयंत पाटलांचा ठाकरेंना टोला

पवार म्हणाले, ‘‘ पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगिकीकरणआणि त्यातून रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनत असून शैक्षणिक संस्थांद्वारे शिक्षणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे आचार-विचार आणि संस्कृतीही पुण्यात येत आहे. पूर्वी पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जाणारे पुणे आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे हब झालेले आहे. पुण्याने देशाला कायमच विचार देण्याचे काम केले आहे. परंतु, अलिकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि कमी होत चाललेला साहित्य व्यवहार ही धोक्याची घंटा आहे.’’

भौतिकदृष्ट्या समाज किती विकसित आहे, यापेक्षा वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या समाज किती प्रगत आहे, यावर तो समाज किती पुढे जाईल हे ठरत असते. वाचन संस्कृतीची पाळेमुळे रुजलेल्या पुण्यात ललित साहित्याची उलाढाल प्रचंड मंदावलेली आहे. हातावर मोजण्याइतके ललित साहित्य विक्रेते पुण्यात तग धरून आहेत. ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसूत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्यपासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उरूस या सगळ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगीण दस्तावेजीकरण आहे,असे पवार यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com