पटोलेंचा इशारा; आता नुरा कुस्ती चालणार नाही

काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकाकडून अशी वर्तणूक अपेक्षीत नव्हती.
नाना पटोले
नाना पटोलेसरकारनामा

पुणे : निवडणुका जवळ आल्या आहेत.जबाबदारीने वागा यापुढे नुरा कुस्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाले यांनी दिला आहे. पटोले यांनी शनिवारी पुण्यात विविध भागात कार्यक्रमांना उपस्थिती लावली. महापालिकेतील एका ठरावावरून गेल्या आठवड्यात पक्षाच्या दोन नगरसेवकांमधील वादाच्या पाश्‍र्वभूमीवर पटोले यांनी हा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकाने आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाविरोधात भूमिका घेऊन त्यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यास भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकाराची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली होती.पण अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक आल्याने कारवाईची भूमिक पक्षाने घेतली नाही.

नाना पटोले
पुणे-पिंपरीत अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालणार का ?

पटोले शनिवारी पुण्यात होते.त्यांनी शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांची भेट घेतली, मेळाव्यांमधून संवाद साधला. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री ज्येष्ठ नगरसेवकाने केलेल्या प्रतापाची तक्रार पटोले यांना दिली होती. त्यांनी त्याच वेळी दोन्ही नगरसेवकांशी चर्चा केली होती. पुण्यात आल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी हा विषय कानावर घातला पण यावर पटोले यांनी भाष्य करणे टाळले.

नाना पटोले
आरोग्य विभागाच्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ : राजेश टोपे आता राजीनामा द्याच

काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकाकडून अशी वर्तणूक अपेक्षीत नव्हती, याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असल्याने आता कारवाई केल्यास चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे सध्या काही होणार नाही असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, ‘‘महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करुण पूर्वीप्रमाणे पुणे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सज्जा व्हावे असे आवाहन केले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com