आजोबांनी फटकरल्या नंतर पार्थ यांनी केले हे ट्विट

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी आणि राममंदिराला पाठिंबा या दोन विषयांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर आता त्यांचे नातू पार्थ पवार यांनी गणेश मंडळांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.
Parth Pawar Tweets about Maharashtra Spirit in Corona Fight
Parth Pawar Tweets about Maharashtra Spirit in Corona Fight

पुणे : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी आणि राममंदिराला पाठिंबा या दोन विषयांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर आता त्यांचे नातू पार्थ पवार यांनी गणेश मंडळांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. 

उत्सव साधेपणाने साजरा करण्यापासून ते रुग्णालयांना मदत करण्यापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने कोव्हीडच्या लढाईत आपला हातभार लावत आहे. हे महाराष्ट्राचे स्पीरीट आहे, असे पार्थ यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, कालच्या शरद पवार यांच्या विधानाबाबत त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करावी ही पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी काल झटकून टाकली. पार्थ पवार अपरिपक्व असून त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही, असे मोठे विधान पवार यांनी काल केल्यानंतर राजकीय चर्चेचे वादळ सुरु झाले. 

दरम्यान, आज सकाळी माध्यमांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. या विधानानंतर अजित पवार काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून बैठक संपण्यापूर्वीच निघून गेल्याची चर्चा होती. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ''पक्षात आणि पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. सुशांतसिंह प्रकरणी पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. पार्थ पवार यांचे मत ते व्यक्तिगत असू शकेल. विरोधी पक्षांकडे टीका करण्यासाठी काही राहिलेले नसल्याने ते यावर बोलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेली बैठक ही पूर्वनियोजित होती. या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत काहीही चर्चा झालेली नाही. अजित पवार हे बैठक सोडून गेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेले," असे पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

दुसरीकडे विरोधकांनी पवार यांच्या विधानाचा राजकीय फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. आज परत सांगतो, पार्थ लंबी रेसका घोडा है ! थांबू नकोस मित्रा! असा शब्दात आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com