Anil Deshmukh News : मला फसविण्यासाठी परमबीर सिंगांचा राजकीय वापर; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Parambir Singh : निलंबन रद्द करून राज्य सरकारकडून परमबिर सिंगांना बक्षीस
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Anil Deshmukh on State Government : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी ऐकीव माहितीवर माझ्यावर आरोप केले. त्यानंतर मला तुरुंगात राहावे लागले. परमबीर सिंग यांचा राजकिय वापर करुन मला फसविण्यात आले. परमबीर सिंग यांच्या मागे एका अदृश्य राजकीय शक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.

यावेळी देशमुख यांनी परमबीर सिंग (Parambir Singh) जेलिटीन प्रकारणातील मुख्य सूत्रधार असल्याचा सांगितले. देशमुख म्हणाले, "परमबिर सिंग यांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात किमान ८ ते १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात खंडणी, कायद्याचा दुरुपयोग या सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या जिलेटीन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार परमबीर सिंगच आहे. तसे राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालातही नमूद आहे."

Anil Deshmukh
Anand Paranjpe News: शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्यच; आनंद परांजपेंचा हल्लाबोल

सिंग यांनी ऐकीव माहितीवर आरोप केल्याचे कबुली दिल्याचेही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले," माझ्यावर काही राजकीय विरोधकांनी परमबीर सिंगला आरोप करण्यास लावले. त्यानंतर ते सात महिने फरार होते. कोर्टाने अनेक वेळा विचारणा करुनही त्यांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही. उलट ऐकीव माहितीवर आरोप केले असून याबाबत पुरावे नसल्याचे शपथपत्र त्यांनी सादर केले. त्यांच्या खोट्या आरोपांमुळे मला १४ महिने तुरुगांत रहावे लागले."

Anil Deshmukh
Rahul Gandhi on Narendra Modi : नवीन संसदेच्या उदघाटनावरून काँग्रेसनं मोदींना घेरले; राहुल गांधींनी केली 'ही' मागणी

परमबीर सिंग यांनी केलेल्या कृत्यामागे अदृश्य राजकिय शक्तीचा हात असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. देशमुखांनी सांगितले की, "परमबीर सिंग याचा राजकीय वापर करुन मला फसविण्यात आले. त्यांच्या मागे एका अदृश्य राजकिय शक्तीचा हात आहे. कॅटला राज्य सरकारने अहवाल दिला नाही. त्यानंतर कॅटच्या एकतर्फी आदेशाचा वापर करीत राज्य सरकारने परमबीर सिंगचे निलंबन रद्द केले. यातून माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल राज्य शासनाकडून (State Government) परमबीर सिंग यांना बक्षीस दिल्याचे स्पष्ट होते. आता पुढे काय करायचे या संदर्भात आम्ही कायदेतज्ञ यांच्याशी बोलत आहोत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com