Chinchwad By Election : अश्विनी जगतापांच्या प्रचारात पंकजा ताईंची बॅटिंग; उपस्थितांना हसु आवरेना

मते मागायला येणारे आम्ही वधूपक्षाचे लोक असतो,
Chinchwad By Election
Chinchwad By ElectionFacebook @Pankajamunde

Chinchwad By Election : भाजपची मुलूखमैदान तोफ आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची काल रात्री चिंचवड पोटनिवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघात (रहाटणी) सभा झाली. यावेळी फर्डे आणि आक्रमक वक्तृत्वाच्या त्यांच्या भाषणाच्या शैलीतील मिश्कीलपणाही डोकावला.

भाषणाची सुरवात करताना पंकजा या व्यासपीठावरील मान्यवरांची नावे घेत होत्या.त्यात त्यांनी त्यांच्या बीड जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थानिक नगरसेवक बाबासाहेब त्रिभूवन यांचेही नाव घेतले. टेल्को कामगार त्रिभूवन यांना ज्यांच्या निधनामुळे चिंचवडची ही पोटनिवडणूक लागली आहे ते या मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीच गतवेळी २०१७ ला प्रथम नगरसेवक केले होते.

Chinchwad By Election
Shivsena : उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आता समोर येणार 'हे' संकट..!

पीएने दिलेल्या या उपस्थितांच्या यादीत बाबासाहेब त्रिभूवनानंतर बाळासाहेब त्रिभूवन असे दुसरे नाव पंकजांनी वाचले. त्यावर त्यांच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली. कारण त्या बाबासाहेब त्रिभूवन यांना ओळखत होत्या. म्हणून दोन त्रिभूवन आहेत का,अशी विचारणा केली. त्यावर नकारार्थी उत्तर आले.त्यानंतर व्यासपीठावरील बाबासाहेब त्रिभूवनांकडे पाहत तुमचा स्पेशल वशिला आहे, दोनदा नाव आले, असे त्या म्हणताच मोठा हशा पिकला. त्यावर ते बीडचेच त्रिभूवन आहेत हे सांगताच पंकजा यांनाही हसू आवरले नाही.

आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंकजांचा कालच्या भाषणात असा मिश्कीलपणा डोकावत होता.मते मागायला येणारे आम्ही वधूपक्षाचे लोक असतो,असे सांगत त्या म्हणाल्या, वर काळा असेना त्याला गोरी बायको हवी असते, जाड असूनही त्याला सडपातळ नवरी पाहिजे असते,असा टोला त्यांनी लगावताच सभेत पुन्हा हास्यकल्लोळ झाला. अश्विनीताईंच्या प्रचाराला बोलावलेत,तसेच विजयानंतरही बोलवा,असे त्या म्हणताच पुन्हा त्याला दाद मिळाली.

Chinchwad By Election
IPS Brijesh Singh News : आयपीएस ब्रिजेश सिंग यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्तीने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

भाऊंची दूरदृष्टी

साहेब माझ्यासह कुटुंबाला वेळ देत नाहीत, म्हणून त्यांच्याकडे माझी नेहमी कुरकुर असायची.पण,अर्ज भरतेवेळी झालेली साठ हजाराची गर्दी पाहून माझी ही कुरकूर चुकीची होती,याचा प्रत्यय आला,असे अश्विनी जगताप आपल्या भावूक भाषणात म्हणाल्या.साहेबांची बॅकबोन आतापर्यंत राहिली असल्याने एकदम उमेदवारीचा एवढा मोठा निर्णय झाल्याने मी पहिल्यांदा घाबरूनच गेले होते,अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. तसेच साहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय देणारी त्यांची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

``१८ वर्षापूर्वी आम्ही दोघे दिल्लीला गेलो होतो.त्यावेळी मी तिथे मेट्रोत बसण्याचा हट्ट धरला आणि तो पूर्ण करून घेतला.हा प्रवास छान वाटल्याने मी सहज त्यांना त्यावेळी म्हटलं की आपल्याकडे पिंपरी-चिंचवडला कराल का अशी मेट्रो? त्यावर ते लगेच उत्तरले का होणार नाही? आणि त्यांनी ते करून दाखवले.त्यांचं हे जिव्हाळ्याचे आणि समृद्धीचं नातं पुढेही कायम ठेवण्यासाठी मी ही पुढे कटिबद्ध आहे``असे त्यांनी सांगितले.

Chinchwad By Election
Shivsena : ठाकरे गटाला धनुष्यबाण गेल्याचा सर्वाधिक फटका बसणार विदर्भाच्या ग्रामीण भागात !

या सभेत मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती,याचा पुनरुच्चार केला.३६ वर्षे शहरासाठी योगदान दिलेल्या लक्ष्मणभाऊंच्या पत्नीला मतदारांपुढे यावे लागल्याबद्दल महेशदादांनी विरोधकांची निर्भत्सना केली.

पण, थेट कुणाचा नामोल्लेख त्यांनी केला नाही.शहरवासियांवर शास्तीकर २००८ ला लादला. त्यावेळी कोणाचे राज्यात सरकार होते, कोण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तुमचे हे कराचे ओझे कमी करण्यासाठीच लक्ष्मणभाऊंनी तुमच्या पक्षाचा राजीनामा दिला होता, असे म्हणणाऱ्या महेशदादांचा रोख हा या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता.आणि हा कर भाजप सत्तेत आल्यानंतरच नुकताच पूर्ण माफ करण्यात आला,याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर, राजकारणात नितीमत्ता,माणूसकी जपली पाहिजे, असे सांगत.मात्र ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता विरोधकांनी माणूसकी सोडल्याचा हल्लाबोल खा. बारणेंनीही यावेळी केला.ते जखमेवर मीठ चोळत आहेत,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in