पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला पालखीसदृश सोहळा तीन दिवस आधीच

Pandharpur Wari News update| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या सोमवारी (ता.२०) पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथे देहू संस्थानकडे सुपूर्त केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला पालखीसदृश सोहळा तीन दिवस आधीच
Pandharpur Wari News update|

पिंपरी : संत तुकोराबारायांची पालखी मंगळवारी (ता.२१) तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी (ता.२२) पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे. पण,तीन दिवस अगोदरच शहरवासियांनी पालखी सदृश सोहळ्याची शनिवारी (ता.१८) अनुभूती घेतली. निमित्त होते पिंपरीचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी दिलेले चांदीचे सिंहासन, मखर व अभिषेकपात्र अशा २१ किलो चांदीच्या पूजा साहित्याच्या वाजतगाजत काढलेल्या मिरवणुकीचे.

तुकाराम महाराज पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर ते आ.बनसोडे यांच्या काळभोरनगर, चिंचवड येथील कार्यालयापर्यंत या अभिषेक सामग्रीची मिरवणूक काढण्यात आली. तिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.हे पूजा साहित्य उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या सोमवारी (ता.२०) पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथे देहू संस्थानकडे सुपूर्त केले जाणार आहे.

 Pandharpur Wari News update|
विधान परिषद निवडणूक : मु्क्ता टिळक ऍम्ब्युलन्सने मतदानाला जाणार

मिरवणुकीने आ. बनसोडे यांच्या कार्यालय आवारात आणलेल्या या पूजा साहित्याची पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.संतोष महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, ह.भ.प. संजय महाराज मोरे, ह.भ.प शेखर कुटे आदींच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. आ. बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम,माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, विनोद नढे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मयूर कलाटे,शितल शिंदे, गीता मंचरकर, संयोजन समिती सदस्य गुलाब कुटे, नीता ढमाले, सिद्धार्थ बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

तुकोबारायांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावर गेल्या साडेतीनशे वर्षांपासून लाखोंचा वारकरी सांप्रदाय मार्गक्रमण करीत आहे हे तुकोबारायांचे ऐश्वर्यच आहे, असे देगलूरकरमहाराज यावेळी आशीर्वादपर भाषणात म्हणाले. तर,"मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या" "देव इच्छीरज चरणीची माती" म्हणजेच देव सुद्धा वारकऱ्यांची भक्तांची सेवा करण्यास इच्छुक असतो. ज्या तुकोबारायांनी कोट्यावधी भाविकांना नाम सांप्रदायाचा, सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी आ. बनसोडे यांना मिळाली. ती भविष्यातही त्यांच्या हातून घडो अशी प्रार्थना गहिनीनाथ महाराजांनी यावेळी विठ्ठलचरणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in