स्वप्नील लोणकरच्या बहिणीच्या लग्नाची जबाबादरी पडळकर यांनी स्वीकारली

आत्महत्येसारखा वाईट विचार जरी मनात आला तर आई-वडिलांचा चेहरा आठवा
lonkar.jpg
lonkar.jpg

पुणे : स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या दिवंगत स्वप्नील लोणकर याच्या घरी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज भेट दिली. स्वप्नीलच्या आई-वडीलांची भेट घेतली. स्वप्नीलाचा भाऊ या नात्याने त्याची बहीण पूजा हिच्या लग्नाची जबाबदारी घेत असल्याचे आमदार पडळकर यांनी यावेळी जाहीर केले.(Padalkar accepted the responsibility of the marriage of Swapnil Lonakar's sister) 

यानंतर केलेल्या फेसबूक पोष्टमधून आमदार पडळकर यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करीत मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. अशाप्रकारे जीवन संपवणे योग्य नाही. असा विचार जरी मनात आला तरी आई-वडिलांचा चेहरा आठवा, असे म्हटले आहे.

फेसबूक पोस्टमध्ये ते म्हणतात, स्वप्नीलच्या आई-वडिलांना भेटलो. खरंतर त्यांच्याशी काय बोलावं हे कळत नव्हतं. आईचं दुख: फक्त आईलाच समजतं. आपण ते समजू शकत नाही.पण स्वप्नीलला न्याय मिळण्यासाठी मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांना दिली. दिवंगत स्वप्नीलचा भाऊ या नात्याने त्याची बहीण पूजाच्या लग्नाची जबाबदारी मी घेत आहे. मला पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करायची आहे.आपण कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. असा विचार जरी मनात आला तर आपल्या आई- वडिलांचा चेहरा आठवा. कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आपण ही लढाई एकत्र लढू.’’ 
Edoted By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in