
UPSC Civil Services Exam Result : घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने 'यूपीएससी'चा चार वर्षांचा कालावधी मोठा संघर्षाचा गेला. या काळात आई-वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' पास झालो. याबाबत सर्वात आधी वडिलांना माहिती दिली. त्यांनी फक्त शाबास म्हणत आपली भावना व्यक्त केली, अशी माहिती मंगशे खिलारेने दिली. मंगेश 'यूपीएससी' परीक्षेत ३९६ रँकने उतीर्ण झाला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील सुकेवाडी या छोट्याशा गावातील मंगेशने मोठे यश प्राप्त केले आहे. या यशाच्या प्रवासाबाबत मंगेशने खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. मंगेशने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकांनी करियरचा मार्ग निवडीसाठी मदत केल्याची आठवणही सांगितली. 'यूपीएससी'साठी स्वत:च्या नोट्स काढून १५ ते १६ तास अभ्यास केल्याचीही माहिती मंगेशने यावेळी दिली. UPSC Civil Services Exam Result
मंगेश खिलारे याने सांगितले की, " गावातील प्राथमिक शाळेतून प्राथमिक आणि दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे संगमनेर कालेजमध्ये विज्ञान शाखेतून बारावी केली. स्पर्धा परीक्षेबाबत संगमनेरच्या शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करण्याच्या हेतून बारावीनंतर बीएससी अॅग्रीकल्चर की बीए, हा मार्ग निवडताना संघर्ष करावा लागला. मात्र आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी 'बीए' करण्याचा ठरविले. त्यानंतर पुण्यातील 'एसपी' महाविद्यालयातून 'बीए' करताना 'यूपीएससी'ची तयारी सुरू केली."
यावेळी मंगेशने आपल्या प्रेरणास्त्रोताबाबतही दिलखुलासपणे माहिती दिली. तो म्हणला, "'यूपीएसीक'डे वळण्यासाठी मी कुठल्याही अधिकाऱ्याकडून प्रेरणा घेतली नाही. माझी ही पिढी कामगार म्हणून काम करते. गावात थोडी शेती आहे. वडिलांची चहाची टपरी आहे. शाळा-कालेजच्या वेळेनंतर मी वडिलांबरोबर चहाच्या दुकानावर काम केले. त्यानंतर रात्री अभ्यास केला. 'यूपीएससी'कडे वळण्यामागे आई-वडीलच माझ्यासाठी मोठी प्रेरणा होते. माझ्या घरची आर्थिक स्थितीत परिवर्तन करण्यासाठीच मी खूप प्रयत्न केले. दरम्यान, माझा आणि मोठ्या अधिकाऱ्यांचा कसलाही संबंध आाल नाही."
स्पर्धा परीक्षा करताना कितीही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास महात्वाचा ठरतो, असेही मंगेशने सांगितले. तो म्हणाला, "मी चार वर्षांपासून तयारी करत आहे. तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळाले. दुसऱ्यावेळी तीन मार्कांनी कमी पडलो. तो क्षण खूप दुःखत होता. या काळात शिक्षकांनी, घरच्याशी पाठिंबा. त्या 'सपोर्टसिस्टम'च्या फायदा म्हणजे हा निकाल आहे. दरम्यान, आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत राहिल्याने यश मिळाले. या निकालाबाबत सर्वात आधी वडिलांना सांगितले. त्यावर ते फक्त शाबास म्हणाले."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.