पुण्यातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या पाचशेवर

पुण्यातील रूग्णसंख्या वाढणार नाही याची जबाबदारी खरेतर प्रत्येक पुणेकराची आहे.
corona1.jpg
corona1.jpg

पुणे : गेल्या काही दिवसात पुण्यात दोनशे-तीनशेच्या दरम्यान असलेली कोरोना रूग्णांची संख्या आज पाचशेच्यावर गेली आहे. आज दिवसभरात तब्बल ५०८ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. २६६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या दोन हजार ५५७ असून दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.(over Five hundred active patients in Pune)

गेले आठवडाभर पुण्यात रूग्णसंख्या दोनशे ते तीनशेच्या दरम्यान होती. आज मात्र त्यात वाढ झाली आहे. रविवारी २७४, सोमवारी २८०, मंगळवारी २६८ तर रविवारी २७४ रूग्णांची नोंद झाली होती. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आजचा आकडा थोडी काळजी वाढवणारा आहे. पुण्यात सोमवारपासून सकाळी सात ते दुपारी चार अशी दुकानांची वेळ करण्यात आली आहे. शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात सर्वत्र मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. विशेष: मंडई, मार्केट येथील गर्दी अधिक वाढताना दिसत आहे.

पुण्यातील रूग्णसंख्या वाढणार नाही याची जबाबदारी खरेतर प्रत्येक पुणेकराची आहे. गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळणे हा यावरचा उपाय आहे.मात्र, परिस्थिती नेमकी उलटी आहे. पुण्यात अनेक ठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. कोरोनापूर्व काळाप्रमाणे अनेक रस्त्यांवर वाहनांची गर्दी रोजच होत आहे. तिसरी लाट आली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा एका बाजूला काम करीत आहेर रूग्णालये आणि इतर पायाभूत सुविधांची तयारी करण्यात येत आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये, यासाठी पुणेकरांकडून खबरदारी घेण्याती तितकीच गरज आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com