४७ हजार इच्छुकांमधून तीन हजार जणांना मिळणार स्वप्नातले घर : अजित पवारांच्या हस्ते उद्या सोडत   

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.
pune mhada.jpg
pune mhada.jpg

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ९०८ सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २) ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.(Out of 47,000 aspirants, 3,000 will get a dream home)
 
म्हाडाच्या या सोडतीमध्ये दोन हजार १५३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७५५ सदनिकांचा समावेश आहे.या सदनिकांच्या नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीमध्ये १३ एप्रिल रोजी ऑनलाइन पार पाडला होता. या सोडतीसाठी ५९ हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४७ हजार नागरिकांनी नोंदणी शुल्क जमा केले आहे. यापैकी भाग्यवान विजेत्यांना सदनिकांची चावी देण्यात येणार आहे. यापूर्वी २२ जानेवारीला पाच हजार ६४६ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सदनिकांच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नागरिकांची सदनिकांची वाढती मागणी पाहता चार महिन्यांतच कोरोनाचा कालावधी असूनही सदनिकांसाठी सोडत काढण्यात येत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचे यू-ट्यूबवर ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे. तसेच, ऑनलाइन सोडतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन म्हडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.  

Edited By Umesh Ghongade
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com