Dipak Kesarkar|
Dipak Kesarkar|

नाहीतर शिवसेनेचे सर्व आमदार आमच्यासोबत आले असते; केसरकरांचा गौप्यस्फोट...

Dipak Kesarkar| मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीतीही नाराजी नाही

पुणे : कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही. एका समाजाला मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळलं, असं मत शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.

दीपक केसरकर आज पुणे दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, संजय राठोड यांच्यावरील आरोपांप्रकरणी चौकशी अजुन सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल, चौकशी निःपक्षपातीपणे होईल, परंतु जर दोषी नसतील तर मंत्री का देऊ नये, तात्कालिन मुख्यमंत्री यांनी त्यांना वचन देऊन मंत्रिपद दिलं नाही. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रीपद दिलं. असे म्हणत त्यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली.

Dipak Kesarkar|
Pankja Munde: पंकजाताई म्हणतात, मला तो `सुखद` अनुभव आलेला नाही!

संजय राठोड यांच्याविषयी फक्त मुद्दे उपस्थित केले जात आहेत. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नसल्यामुळेच अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. संजय राठोड दोषी असते तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. पण त्यांच्याबाबत संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना होत्या. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्रीपद दिले, असे केसरकर यांनी सांगितलंं.

तसेच, मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीतीही नाराजी नाही. शिंदे गटात गेलेल बंडखोर आमदार शिवसेनेत परत येतील असे ते म्हणत होते. पण आता शिंदे गटाचे संख्याबळ वाढत आहे. जे नाराज होते ते बाहेर पडले, उठाव करायला धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्वच आले असते. असा खोटच टोला दीपक केसरकर यांनी शिवसेनेला लगावला.

आरेमध्ये पैशांचा अपव्यय झाला असता, एखाद्या गोष्टीमुळे असे प्रकल्प रखडले तर नुकसान झालं असतं. पण सुप्रीम कोर्टाने याबाबतची परवानगी दिली होती. शेवटी पर्यावरण रक्षण झालं पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहोत.आपण नेहमी हे विचारता,यावरून मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही, मी काही बोललो तर टायटल होते, मी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण मला ते नकोय, म्हणून मी त्यांच्याबाबत बोलणं टाळतो, असही स्पष्टीकरण दीपक केसरकर यावेळी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com