राष्ट्रवादीमुळे `अग्निपथ`ला महाराष्ट्रातही विरोध, मध्य भारतात हे लोण पसरणार?

NCP| BJP| Agnipath Scheme| भाजपशासित केंद्र सरकारच्या `अग्निपथ` या कंत्राटी लष्करी भरतीला देशभरात मोठा विरोध सुरु झाला आहे.
राष्ट्रवादीमुळे `अग्निपथ`ला महाराष्ट्रातही विरोध, मध्य भारतात हे लोण पसरणार?
Agnipath Scheme| NCP|

पिंपरी : चार वर्षातच ऐन उमेदीत तरुणांना पुन्हा बेकार करणाऱ्या भाजपशासित (BJP) केंद्र सरकारच्या `अग्निपथ` या कंत्राटी लष्करी भरतीला देशभरात मोठा विरोध सुरु झाला आहे. त्यातही उत्तरेकडील १३ राज्यात त्यावरून आगडोंब उसळला आहे. हा विरोध आता महाराष्ट्रातही सुरु झाला असून युवक राष्ट्रवादी (NCP) त्याविरोधात येत्या सोमवारी (ता.२०)राज्यभर आंदोलन करणार आहे.त्यातून अग्निपथविरोधी आंदोलनाचे लोण आता मध्य भारतातही येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीने `अग्निपथ`ला विरोधच केला नसून,तर कृषी कायद्याप्रमाणे ही योजनाही रद्द करावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी आंदोलन छेडले आहे,असे युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्त रविकांत वरपे म्हणाले.या ठेकेदारी पध्दतीने भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट होणार असल्याने या योजनेला विरोध असल्याचे ते म्हणाले. देशभक्तीची खोटी झाल पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम भाजपने या योजनेतून सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला.

Agnipath Scheme| NCP|
डिझेल चोरांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला

सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे,असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने सैन्य दलात युवकांना संधी मिळावी, यासाठी अग्निपथ ही योजना अंमलात आणली आहे. मात्र या योजनेला बिहारमधील युवकांनी जोरदार विरोध केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बिहारसह इतर राज्यातही तरुणांनी या योजनेच्या निषेधार्थ एल्गार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून संतप्त युवकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करून रस्त्यावर टायर पेटवून दिले. यूपी, बिहार, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थानसह 13 राज्यांमध्ये हिंसाचाराचा वणवा पोहोचला आहे. बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in