विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंतच : जयंत पाटील

विरोधकांचीमजल राष्ट्रपती राजवटीपलिकडे नाही,
jay.jpg
jay.jpg

पुणे : मनसूख हिरेन यांची हत्या कुणी केली तसेच उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटके कुणी ठेवली याचा शोध लागणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, त्यावर काही बोलण्यापेक्षा केवळ राष्ट्रपती राजवट लावण्याची विरोधकांना घाई आहे. मुळात यांची मजल राष्ट्रपती राजवटीपलिकडे नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फडणवीस यांनी केलेले आरोप आणि केंद्राला अहवाल देऊन ‘सीबीआय’ चौकशीची केलेली मागणी केवळ विषय चर्चेत राहण्यासाठी केलेली आहे. त्या अहवालात विशेष नाही. त्या काळात केलेल्या सर्व बदल्या नियमाप्रमाणेच आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षात चर्चा होऊनच बदल्या नियमाप्रमाणे झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी सादर केलेला अहवाल धादांत खोटा आहे. उलट या सर्व काळात करण्यात आलेल्या फोन टॅपिंगची चौकशी होण्याची गरज आहे, असे पाटील यांनी सांगितले. या काळात फोन टॅपिंग करण्याचे काही संकेत आहेत. त्यासाठी तशी सबळ कारणे लागतात. मात्र, शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगला कोणते सबळ कारण होते. त्यासाठी त्यांनी कुणाची परवानगी घेतली होती. परवानगी न घेता अशाप्रकारे टॅपिंग करण्याचा आधिकार त्यांना कुणी दिला. या साऱ्याची चौकशी झाली पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

मनसूख हिरेन यांच्या हत्येचा तपास ‘एसआयटी’ करीत होती त्याचवेळी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या बाबतीतला तपास ‘एआयए’ करीत होती. मात्र, हिरेन यांच्या हत्येच्या तपासाची जबादारी ‘एनआयए’ने आपल्याकडे घेतली आहे. याच दरम्यान परमवीरसिंग यांनी शंभर कोटींचा आरोप केल्यानंतर ‘एनआयए’कडून तपासासंदर्भात बातम्या बाहेर येण्याच्या कमी झाल्यात असे पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात चांगली जबाबदारी सांभाळली. या कामात ते रूळले आहेत असे वाटत असतानाच आता ते केवळ राष्ट्रपती राजवटीवरच बोलू लागले आहेत. यामुळे केवळ सत्तेकडे डोळे लावून बसलेला पक्ष ही भाजपाची होणारी प्रतिमा त्यांच्या पक्षासाठी चांगली नाही, याचे भान फडणवीस यांनी ठेवायला हवे, असा टोला पाटील यांनी लगावला.

अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांचे प्रकरण, हिरेन यांची हत्या तसेच शंभर कोटी रूपयांच्या आरोपाबाबत खरी माहिती तपासाअंती समोर येईल. त्यातून खरे काय ते स्पष्ट होईल. ‘एनआयए’च्या तपासातून ते देशातील आणि राज्यातील जनतेला कळायला हवे, असे पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com