Mahesh Landge and Ajit Pawar : आमदार महेशदादांच्या मागणीला अजितदादांची साथ!

Pimpri-Chinchwad : 'आता हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योग चाललेत हैदराबादला...'
Mahesh Landge and Ajit Pawar
Mahesh Landge and Ajit PawarSarkarnama

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आज (ता.२९) विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी साथ देताना हिंजवडी आयटी पार्कमधून हैदराबादला स्थलांतरित होत असलेल्या मोठ्या उद्योगांच्या गंभीर समस्येकडेही राज्य सरकारचे लक्ष वेधले.

उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या प्रश्नात राजकारण न आणता सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज अजित पवार यांनी आ.लांडगेच्या लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेताना प्रतिपादित केली. त्यासाठीच्या सहकाऱ्यांला तयार असल्याची हमीही त्यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही मोठ्या लोकसंख्येच्या शहरांतील रोजगार कमी होत असताना होत असलेले उद्योगांचे स्थलांतर ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahesh Landge and Ajit Pawar
Rahul Narvekar : मोठी बातमी! सहा महिन्याच्या आत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर विरोधकांचा अविश्वास ठराव

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात राज्यात तळेगाव एमआयडीसीत (ता.मावळ,जि.पुणे) होऊ घातलेला पावणेदोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा आणि दीड लाख रोजगार निर्माण कऱणारा वेदांत फॉक्सकॉन हा महत्वाकांक्षी प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यापुर्वी अचानक गुजरातला गेल्याने राज्यात मोठे वादळ उठले होते.

Mahesh Landge and Ajit Pawar
Winter Session : फडणवीसांची गुगली; ...तर नाथाभाऊ तुम्हीच थांबवले असते ना आमचे लग्न!

त्यानंतर आता हिंजवडीतील असुविधांच्या यक्ष प्रश्नांमुळे व त्यातही तेथील वाहतुकीच्या मोठ्या ज्वलंत समस्येमुळे तेथील उद्योग सुद्धा राज्याबाहेर हैदराबाद येथे चालकडे अजितदादांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. हौसिंग सोसायट्यांचे प्रश्न पिंपरी-चिंचवडसह पुण्याच्याही दृष्टीने महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.

Mahesh Landge and Ajit Pawar
Dipali Sayyad : दिपाली सय्यद दोन महिन्यांपासून वेटिंगवर; शिंदे गटातला प्रवेश कुठे अडला?

त्यामुळे याप्रश्नीही गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांच्या जोडीने नगरविकास सचिव, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे (Pune) आणि पिंपरी पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, महावितरण आणि एमआयडीसीचे अधिकारी अशा सर्व सबंधित विभागांसह आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली. ती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगेच मान्य केली. येत्या जानेवारीत ती पुण्यात घेऊ, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in