बारामती जिंकायची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच : रासपच्या प्रदेशाध्यक्षांचा दावा

बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी जानकरांना जनतेने भरभरून प्रेम दिले आहे.
RSP Metting
RSP MettingSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : बारामती (Baramati) जिंकण्याची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यामध्येच आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केला. (Only Mahadev Jankar has the strength to conquer Baramati: Kashinath Shewte claims)

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकरांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १२ ऑक्टोबर) इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेली पाणी टाकी व पाईप लाईनचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त इंदापूर तालुका रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आला आहे, असेही प्रदेशाध्यक्ष शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी सांगितले.

RSP Metting
पवार चुलता-पुतण्याने राजकारणात मला २० वर्षे कोंडून ठेवले : शहाजी पाटलांचा गंभीर आरोप

इंदापूर तालुक्यामध्ये महादेव जानकर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी जानकरांना जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून रासप निश्चितपणे जिंकू शकतो. बारामती जिंकायची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर यांच्यातच आहे, असे शेवते म्हणाले.

RSP Metting
शिंदे गट अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारच देणार नाही; मग चिन्हासाठी घाई का? : शिवसेनेचा आयोगापुढे दावा

ते म्हणाले की,गेल्या महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कमिटीचा मेळावा जानकर यांच्या उपस्थित झाला. बारामती लोकसभेची रासपची संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे. रुई-बाबीर येथील मेळाव्याच्या माध्यमातून बारामती लोकसभा जिंकण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. जानकर यांच्या उपस्थित हा एल्गार मेळावा होणार आहे.

RSP Metting
निवडणूक आयोगाचा शिवसेनेला मेल : ‘तुमची माहिती फॉरमॅटमध्ये नाही; पुन्हा पाठवा’

या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाणे, रासप नेते सतीश तरंगे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एफआरपीसाठी कर्मयोगीच्या विरोधात आंदोलन

इंदापूर बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने अद्यापही गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. साखर आयुक्तांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला उर्वरीत एफआरपीची रक्कम व्याजासह देण्याचा कारखान्यास आदेश द्यावा, यासाठी उद्या (ता. ९ ऑक्टोबर) इंदापूर येथे पुणे-सोलापूर महामार्गावरील मालोजीराजे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com