Kasba Constituency : कसब्यात भाजपाचा उमेदवार ठरल्यानंतरच कॉंग्रेसचे ठरणार; निवडणूक लढण्यासाठी शिवसेना आग्रही

निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला म्हणजे त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
Kasba Constituency By Election
Kasba Constituency By ElectionSarkarnama

Kasba Constituency By Election News: दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने अचानकणे निवडणूक जाहीर केली. दोघांच्याही निधनाला अद्याप एक महिना झाला नसताना आयोगाने निवडणूक जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक इतक्या कमी काळात निवडणूक जाहीर होतील हा अंदाज कोणत्याच राजकीय पक्षाला नसताना अचानकपणे थेट निवडणुकीच्या तारखाच जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्येदेखील गोंधळ उडाला.

निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला म्हणजे त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या पाश्‍र्वभूमीवर विरोधात उमेदवार उभा करावचा की नाही यावर महाविकास आघाडीच (Mahavikas AghadI) विचारमंथन सुरू आहे. आघाडीतील स्थानिक नेते निवडणूक लढण्याच्या मानसिकतेचे आहेत.

यासाठी पंढरपूर आणि कोल्हापूरचा दाखला देण्यात येतोय. या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाने निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.परिणामी या दोन्ही निवडणुका झाल्या.त्यामुळे पुण्यात निवडणूक लढविली पाहिजे यासाठी कॉंग्रेस व शिवसेनेचे स्थानिक नेते आग्रही आहेत.

Kasba Constituency By Election
Satyajeet Tambe : निलंबनावर सत्यजीत तांबेंनी मौन सोडलं; म्हणाले, निलंबित केल्याचे दु:ख, पण..

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा इतके दिवस दबक्या आवाजात सुरू होती. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार होणार याची चर्चा सुरू झाली. या तिघांच्या नावाची चर्चा आधीपासून आहे.

मात्र, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक टाळण्यासाठी शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शैलेश टिळक यांना उमेदवारी दिल्यास विरोधकांकडून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनूकुलता दर्शविली जाऊ शकते हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Kasba Constituency By Election
Kasba Assembly By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडणार का? बापटांचा झाला होता पराभव...

पोटनिवडणुकीतला मुंबईतल्या अंधेरी विधानसभा मतदारसंघाचा दाखला शिवसेनेकडून देण्यात येत असून भाजपाच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा केलाच पाहिजे, अशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे उमेदवार कॉंग्रेसचाच असेल. कॉंग्रेसकडूनही इच्छुकांची चाचपणी सुरू असून भाजपाचा उमेदवार कोण जाहीर होतोय त्यावर कॉंग्रेसचा निर्णय अवलंबून आहे. या विषयात शिवसेना आक्रमक असली तरी राष्ट्रवादी मात्र शांत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com