एका मांजरामुळे झाले शंभर कोटींचे नुकसान आणि तीन लाख रहिवाशांची होरपळ...

Mahavitaran|Niitin Raut|PCMC: भोसरी उपकेंद्रामध्ये पर्यायी रोहित्र बसविण्याची व्यवस्था सुरू आहे. तोपर्यंत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
Mahavitaran
MahavitaranSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) भोसरी आणि आकुर्डी भागातील साठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (ता.२३ मार्च) सकाळी खंडित झाला होता. तो आठ तासानंतरच सुरळीत झाला. तोपर्यंत भोसरी एमआयडीसीतील (Bhosri MIDC) साडेसात हजार लघुउद्योजकांचे शंभरकोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर, दुसरीकडे तीन लाखांवर पिंपरी-चिंचवडकरांची ऐन उन्हाळ्यात मोठी होरपळ झाली होती. महापारेषण कंपनीच्या भोसरीतील अतिउच्चदाब उपकेंद्रातील बिघाडामुळे विजेचा हा खेळखंडोबा झाला होता. त्या बिघाडाला एक मांजर कारणीभूत ठरली. महापारेषण कंपनीनेच तसे सांगितले आहे. (Mahavitaran)

Mahavitaran
आमदार जगतापांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि विधवांना मिळाला दिलासा...

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील वीजबिघाडाचे पडसाद गुरुवारी (ता.२४ मार्च) विधानसभेतही उमटले. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी विधीमंडळाच्या प्रवेशव्दारावर राज्य सरकारचा निषेधार्थ आंदोलन करीत नंतर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, युद्धपातळीवर प्रयत्न करून दुपारनंतर ही बिघाड दुरुस्त करण्यात महापारेषणला यश आले. मांजरामुळे हा तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता, असे त्यानंतर महापारेषणच्या प्रवक्त्याने सांगितले. अधिवेशन सुरु असल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान सचिव (ऊर्जा) तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी वेळोवेळी याबाबत माहिती घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले होते. दरम्यान, या घटनेला कारणीभूत ठरलेले मांजर वीजेचा शॉक बसून मरण पावले आहे.

Mahavitaran
भोसरीत वीज गेली अन् पिंपरी-चिंचवडचा आवाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच घुमला...

महापारेषणच्या भोसरी येथील विद्युत रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड झाला. त्यामुळे भोसरी, आकुर्डी व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी भोसरी एम.आय.डी.सी, भोसरी परिसर, आकुर्डी परिसरात चक्राकार पध्दतीने भारनियमन करावे लागले, असे महापारेषणमधून लेखी स्वरुपात सांगण्यात आले. बिघाड झालेले रोहित्र सध्या पूर्णतः नादुरूस्त आहे. ते बदलण्यासाठी साधारणतः दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. महापारेषणकडून भोसरी उपकेंद्रामध्ये पर्यायी रोहित्र बसविण्याची व्यवस्था सुरू आहे. तोपर्यंत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com