राज्यपालांच्या शिफारसपत्रावर भोंडवे म्हणाले, ‘आमचे एकच बॉस...अजितदादा!’

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिफारस झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून कळाले असते : मोरेश्वर भोंडवे
Moreshwar Bhondwe
Moreshwar BhondweSarkarnama

पिंपरी : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्तीचा घोळ गेली काही महिने सुरु आहे. हा तिढा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यामुळे लांबल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला आहे. दरम्यान, हा पेचप्रसंग मिटला नसताना राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांऐवजी भलतीच सहा नावे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सुचविल्याचे पत्र व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ता. २९ सप्टेंबर २००० चे म्हणजे दीड वर्षापूर्वीचे हे पत्र आता व्हायरल झाल्याने त्यातील फोलपणाही लगेच स्पष्ट झाला. ते बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यातील सहा नावांत एक नाव पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondwe) यांचे आहे. या पत्राबाबत माहिती नसल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’ला आज (ता. १९ एप्रिल) सांगितले. मात्र, ते बनावट असल्याचा संशय त्यांनीही व्यक्त केला. ते खरे असते, तर पक्षाकडून फोन आला असता, असे ते म्हणाले. (On the Governor's recommendation, Moreshwar Bhondwe said, "Our only boss ... Ajit Dada!")

Moreshwar Bhondwe
इतर पक्षातील नेते संपर्कात; लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंतरावांचा गौप्यस्फोट

काही राजकीय व्यक्तींची शिफारस केल्याने विधान परिषदेवरील बारा सदस्यांची नियुक्ती राज्यपालांनी रोखून धरली आहे, त्याला कायद्याचाही आधार आहे. परिणामी राज्य सरकारही काही करू शकलेले नाही. न्यायालयानेही त्यावर थेट आदेश दिलेला नाही. मात्र, व्हायरल झालेल्या राज्यपालांच्या बनावट पत्रात नियुक्तीसाठी पुन्हा भोंडवे यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींचीच पुन्हा शिफारस झाल्याने हे पत्र बनावट असल्याचा वास आला. कारण, राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीला आक्षेप घेणारे राज्यपाल त्यांच्याच नावांची शिफारस कशी करतील, अशी शंका व्यक्त होत आहे, त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Moreshwar Bhondwe
फसवाफसवी आपल्याला जमत नाही; आम्ही जे बोलतो ते करतोच : जयंतरावांनी सुनावले

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेले राज्यपालांचे पत्र बोगस असल्याचा संशय व्यक्त करतानाच आमचे एकच बॉस अजितदादा असल्याचे नगरसेवक भोंडवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ते सांगतील ते करणार. त्यांनी ही संधी दिली, तर आनंदच आहे, असे ते म्हणाले. भोंडवे हे १६ ड प्रभागातून (रावेत) गतवेळी २०१७ मध्ये निवडून आले होते. ती त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म होती. ते २०२२ चीही पालिका निवडणूक पुन्हा लढणार आहेत. त्यांचे बंधू तुकाराम भोंडवे हेही दोनवेळा नगरसेवक राहिलेले आहेत. विधानसभेची २०१४ ची निवडणूक भोंडवे यांनी चिंचवड मतदारसंघातून लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण जगताप यांनी त्यांचा पराभव केला होता. ते अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Moreshwar Bhondwe
बारा आमदारांच्या नावावर फुली..राज्यपालांनी उलट मुख्यमंत्र्यांनाच दुसरी सहा नावं पाठवली?

अजितदादा गरिबांचे धनी असून त्यांच्यापुढे नाही. ते सांगतील ते काम करणार, असे ते आपल्या विधान परिषद नियुक्तीच्या व्हायरल झालेल्या बनावट शिफारसपत्रावर बोलताना म्हणाले. विधानपरिषदेवर संधी मिळाली, तर आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढणार का, असे विचारले असता मग कशाला लढू, असे उत्तर त्यांनी दिले. आमदार झाल्यावर पक्षाची पिंपरी पालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com