Eknath Shinde at Kille Shivneri : संभाजीराजेंच्या नाराजीवर एकनाथ शिंदे म्हणाले, यापुढे...

रयतेच्या हितासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही.
Eknath Shinde at Kille Shivneri
Eknath Shinde at Kille Shivneri Sarkarnama

Eknath Shinde at Kille Shivneri : आमचे निर्णय हे राज्याच्या हिताचे निर्णय आहेत. जनतेच्या हितांचं काम सरकार नक्की करेल, कुठेही हात आखडता घेणार नाही, राज्याच्या विकासासाठी काही कमी पडणार नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे. शिवजंयती निमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याचवेळी त्यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरही भाष्य केलं आहे.

हे सरकार तुमचं आहे. तुमच्या भावनांची कदर आहे, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नाराजीची आम्ही नोंद घेतली आहे. संभाजी राजेंच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. पुढच्या वर्षीपासून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन तुम्हाला विश्वासात घेऊन केलं जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं आहे.

Eknath Shinde at Kille Shivneri
Amul Co-op Milk Society : कॉंग्रेसच्या आणखी एका गडाला सुरुंग; 75 वर्षात पहिल्यांदाच 'अमूल'वर भाजपजी सत्ता

आज आपल्या घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. महाराजांनी अलौकिक कार्य या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांचं कार्य केलं. सर्वांच्या मनात महाराजांचं कार्य आहे. आज दिल्लीतील लाल किल्ल्यातही शिवजयंती साजरी केली जात आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात आपले सण साजरे करता आले नाहीत. शिवाजी महाराजांनी वयाच्या १२ व्या वर्षी स्वराज्यांच स्वप्न पाहिले. मोठमोठं पराक्रम केले. रयतेच्या हितासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. त्या काळात त्यांनी एवढे मोठमोठ गडकोट कसे बांधले असतील, त्याकाळी गडावर अन्न पाण्याची सोय कशी केली असेल, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

तर पुढच्या वर्षीपासून किल्ल्यावर येण्यासाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही. शिवभक्तांसाठी योग्य नियोजन केलं जाईल. असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात रायगडावर उत्खनन सुरु आहे. त्यात इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील ग़डकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण जेवढा निधी देतो त्याव्यतिरिक्त आणखी तीन टक्के निधी गडकिल्ल्यांकरता राखून ठेवला जाणार आहे. पुण्यातील वढु-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाटी ३९७ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in