राष्ट्रवादी आक्रमक; महिला पदाधिकाऱ्याला मारहाण भाजप नेत्याला महागात पडणार

Pune Political news| NCP| BJP| Vaishali Nagawade| भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.
 Vaishali Nagawade| Prashant Jagtap
Vaishali Nagawade| Prashant Jagtap

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)च्या काही पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. नागावडे यांना मारहाण करणाऱ्या भाजप नेत्यावर मोक्का लावण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी भाजपच्या भस्मराज तिकोने यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. काल ज्या अमानुष प्रकारे आमच्या भगिनी वैशाली नागावडे यांना मंत्री स्मृती इराणी यांच्या समोरच मारहाण करण्यात आली. त्यानंतरही देवेंद्र फडवणीस यांनी या घटनेबाबत महाराष्ट्राची माफी न मागता भाजप नेत्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीस वर्षांपासून तिकोने हा भाजपचा कसबा मतदार संघातील कार्यकर्ता आहे. तिकोने यांच्यावर आधीही मारामाऱ्या, दंगली असे आणखी दहा गुन्हे दाखल असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

 Vaishali Nagawade| Prashant Jagtap
भाजप नेते अडचणीत! वैशाली नागवडेंना मारहाण करणं पडलं महागात

तिकोनेसोबतच आणखी एक प्रमोद कोंढरे म्हणून कार्यकर्ता आहे. त्याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले. आता कायद्यानुसार ज्यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मोक्का लावता येतो. त्यामुळे भाजपचा, देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा उघड करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com