अमृता फडणवीसांविषयी आक्षेपार्ह कमेंट करणे आलं अंगलट; जुन्नरमधील तरुणास अटक

जुन्नर तालुक्यातील भाजपच्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
 Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Sarkarnama

आळेफाटा (जि. पुणे) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना उद्देशून कमेंट करणे जुन्नर (Junnar) तालुक्यातील तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या कमेंटप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी त्या तरुणास अटक केली आहे. (Offensive comments about Amruta Fadnavis; Youth arrested in Junnar)

अमित सुदाम वायकर (रा. कावळेमळा, चाळकवाडी-पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील सभेत खरी शिवसेना आमच्या सोबतच असल्याचे म्हटले होते. त्याबाबतचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर अमित वायकर याने कमेंट केली होती.

 Amruta Fadnavis
...तर शिवसेना आणि महाराष्ट्र माझाच म्हणावा लागेल : उदयनराजे

अमित वायकर याने फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना उद्देशून आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील भाजपच्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित वायकर याने अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील व खालच्या दर्जाची हीन भाषा वापरून विनयभंग करण्याच्या उद्देशाने कमेंट करून ती समाज माध्यमावर प्रसिद्ध केली. तसेच, आम्हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी बुचके यांनी फिर्यादीत केली होती.

 Amruta Fadnavis
‘मी शिवसेनेशी गद्दारी केली नाही; उलट पक्षानेच माझ्याबरोबर गद्दारी केली’

आळेफाटा पोलिसांनी त्या फिर्यादीची दखल घेत अमित वायकर याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ५०९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६७ नुसार गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वायकर याला अटक करण्यात आली आहे. आळेफाट्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तपास करत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन क्षीरसागर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com