लाच प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी)पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घोडे पाटील व हांडे यांनी तक्रारदाराकडे सात ऑगस्ट रोजी पाच लाख रूपयांची लाच मागणी केली होती.
Offence Registered against police officer of Pune Rural for demanding Bribe
Offence Registered against police officer of Pune Rural for demanding Bribe

पुणे  : अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील व पोलिस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी)पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घोडे पाटील व हांडे यांनी तक्रारदाराकडे सात ऑगस्ट रोजी पाच लाख रूपयांची लाच मागणी केली होती. 

मात्र, तक्रारदाराला हा प्रकार अयोग्य वाटला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन दोघाविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. तर पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर पर्यवेक्षण अधिकारी आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com