पुणे ZP आरक्षण सोडतीत गोंधळ : आता आंबेगाव तालुक्यातूनही तक्रार

आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील कळंब-चांडोली गटातील आरक्षण सोडतीवर हरकती
Pune ZP
Pune ZPSarkarnama

मंचर : पुणे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत बारामती तालुक्यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यातही चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली गटात याआधी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षण असताना सुद्धा हा गट पुन्हा महिला अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित झाला आहे. यावर अनेक जणांनी हरकती घेतल्या आहेत.

वास्तविक पाहता येथे सर्वसाधारण पुरुष आरक्षण येणे अपेक्षित होते. सदर चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली गटातील आरक्षण सोडत पुन्हा काढावी. अशी मागणी या गटातील अनेक जण हरकतीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्याकडे सोमवारी करणार आहेत.

Pune ZP
शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अडचण महाराष्ट्राला एकदा सांगूनच टाकावी : अजित पवार

येथील हरकतीची दाखल घेऊन जिल्हाधिकारी देशमुख यांनी फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा. अशी मागणी या भागातून केली जात आहे. या गटात आरक्षण सर्वसाधारण पुरुष असे अपेक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), शिवसेना शिंदे गट, भाजपचे (BJP) कार्यकर्ते हरकत नोंदविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्रकार पद्धतीने आरक्षण लागू होणे गरजेचे आहे. यापूर्वी चार वेळा झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाचाही आढावा घ्यावा लागेल. त्यामुळे चांडोली-कळंब गटातील नागरिकांना आरक्षणाबाबत न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येथील आरक्षणाबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Pune ZP
जीभ वारंवार घसरते आहे; योग्य राज्यपाल महाराष्ट्रसाठी द्यावा : संभाजीराजेही मैदानात

दरम्यान, याबाबत आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर यांचेशी ''प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले "आरक्षणाबाबत हरकती प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार आवश्यक चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जाईल" कळंब-चांडोली गटात आतापर्यंत लागू झालेले आरक्षण : सन २००२ खुला प्रवर्ग गट, सन २००७ अनुसूचित जमाती (एसटी) पुरुष, सन २०१२ इतर मागासवर्गीय (ओबीसी), सन २०१७ सर्वसाधारण महिला, सन २०२२ अनुसूचित जमाती (एसटी) महिला असे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com