ओबीसी आरक्षण : पुणे-पिंपरी पालिका आडनावांवरून ओबीसींना शोधणार

पुणे व पिंपरीतील विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची बूथनिहाय माहिती गोळा करण्यात येणार आहे.
pmc
pmcsarkarnama

पुणे : ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) न्यायालयात सादर करावयाच्या ‘इम्पिरिकल डाटा’ गोळा करण्यासाठी पुणे व पिंपरी महपालिकेने (PMC and PCMC) क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ओबीसींच्या आडनावांवरून बूथनिहाय माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

pmc
नितेश राणे म्हणातात, संजय राऊत हा `लोमटया` आहे

पुणे व पिंपरीतील विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची बूथनिहाय माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी आडनाावांवरून त्यांची जात शोधली जाणार आहे.ज्यांच्याबाबत खात्री होत नाही. त्यांना फोन करून माहिती विचारण्यात येणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

pmc
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं !

पुणे व पिंपरीतील विधानसभा मतदारसंघातून सुमारे ३३ ते ३५ लाख मतदार आहे.मतदारयादीतील आडनावांवरून ओबीसींची माहिती एकत्र करण्यात येणार आहे. ज्यांच्याबाबत शंका आहे त्यांना फोन करून त्यांच्या जातीची माहिती घेण्यात येणार आहे. माहिती गोळा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून ओबीसींची नेमकी संख्या ठरविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

pmc
अखेर सचिन वाझेची सही झाली! आता थेटच देशमुखांशी सामना

पुण्यात १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या कार्यालयांकडे काम सोपविण्यात आले असून लवकरात लवकर काम पूर्ण करून ओबीसींची आकडेवारी मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात येणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितली.ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास राज्य सरकार आग्रही असले तरी ओबीसींची संख्या न्यायालयापुढे नेमकेपणाने मांडल्याशिवाय ओबीसी आरक्षणाला न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळणे शक्य नाही.

ओबीसींची नेमकी संख्या सांगता आली तरच न्यायालयात टिकाव लागणार आहे.त्यामुळे ओबीसींची नेमकी आकडेवारी सादर करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ओबीसींची नेमकी संख्या शोधण्यासाठी काटेकोरपणे शोध घेतला जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com