OBC Reservation : महेश झगडे आयोगात नसते तर बांठिया यांनी ओबीसींची कत्तल केली असती!

हरी नरके यांनी महेश झगडे यांच्या योगदानाबाबत त्यांचे आभार मानले आहेत.
OBC Reservation Latest Marathi News
OBC Reservation Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बांठिया आयोगाच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण देत निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून आरक्षणावर सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. पण आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच शिंदे-फडणवीस सरकारकडूनही आता याचे श्रेय घेतले जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (Hari Narke) यांनी आयोगातील सदस्य महेश झगडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. (OBC Reservation Latest News)

हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणाबाबत ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी राज्य सरकारने समर्पित आयोग नेमला. जयंत कुमार बांठीया हे अध्यक्ष तर महेश झगडे, नरेश गीते, एच. बी. पटेल, लोकसंख्या अभ्यास केंद्राचे प्रतिनिधी, TISS चे प्रतिनिधी आणि पंकज कुमार हे सदस्य सचिव असे सात जण आयोगात होते.

OBC Reservation Latest Marathi News
NCP : मोठी बातमी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील विभाग, सेल बरखास्त

आयोगाला आधी तीन महिने व नंतर वाढीव एक अशी चार महिने मुदत दिली गेली. आयोगाचे इंपिरिकल डेटा व ट्रीपल टेस्टबाबतचे सर्व संशोधन शिंदे सरकार येण्याआधीच पूर्ण झालेले होते. अहवाल लेखनही पूर्ण होत आलेले होते. नवे सरकार आले तेव्हा फक्त टायपिंग बाकी होते. नवीन सरकारने तयार अहवाल न्यायालयात फक्त सादर केला, असं नरके यांनी म्हटलं आहे.

वकील आधीचेच होते. त्यांना अहवालाचे ब्रिफिंग करण्यासाठी वरिष्ठ सदस्य झगडे हे गेली अनेक दिवस दिल्लीत तळ देऊन बसले होते. केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची उपस्थिती आज न्यायालयात महत्वाची ठरली. ठाकरे-पवार सरकार, शिंदे- फडणवीस सरकार आणि छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून आरक्षण परत मिळाले, असं सांगत नरके यांनी दोन्ही सरकारला श्रेय दिलं आहे.

सर्वात मोठे योगदान महेश झगडे यांचे होते. बांठियांचा सामाजिक न्यायविरोध व ओबीसीद्वेष यामुळे ओबीसींची लोकसंख्या कमी दाखवली गेली. जर झगडे या आयोगात नसते तर कातडी बचावू सदस्य व ओबीसीद्वेष्टे बांठिया यांनी ओबीसींची कत्तल केली असती, असा आरोप नरके यांनी केला आहे. धन्यवाद झगडे, ओबीसी आपले कृतज्ञ आहेत, असं म्हणत नरके यांनी झगडे यांचे आभारही मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com