पुण्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दोन हजार सातशेवर

पुण्यात अनलॉकची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू कऱण्यात आली.
corona 2.jpg
corona 2.jpg

पुणे : आज दिवसभरात पुण्यात २४६ पाझिटिव्ह रूग्ण सापडले तर ३५१ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. कोरोनाबाधीत २१ रूग्णांचा मृत्यू झाला असून ४८३ क्रिटिकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत.ॲक्टिव्ह रूग्णसंख्या दोन हजार ७७३ वर आली आहे.(The number of positive patients in Pune is over two thousand seven hundred)

पुण्यात अनलॉकची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू कऱण्यात आली. सोमवारपासून त्यात आणखी सूट देऊन सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली.रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेलला परवानगी देण्यात आली असून खासगी शिकवणी वर्ग व अभ्यासिका व ग्रंथालयांना पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एप्रिल आणि मे महिना पुणेकरांसाठी अत्यंत वाईट होता. या काळात पुण्यात कोरोनाची दुसरी मोठी लाट होती. या काळात रूग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. पुण्यातील सर्व रूग्णालये, नव्याने उभारलेली कोवीड सेंटर तसेच उपनगरातील सर्व छोटी-मोठी रूग्णालये रूग्णांनी भरून गेली होती. अनेकवेळा रूग्णांना बेड मिळू शकल्या नव्हत्या. ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर व व्हेंटिलेटरची प्रचंड कमतराता या काळात जाणवत होती.

दोन महिन्यांचा हा काळ पुणेकरांसाठी मोठ्या कसोटीचा होता. या काळात देशात दिल्लीच्या बरोबरीने पुण्यात सर्वाधिक पेशंट होते.या पाश्‍र्वभूमीवर पुण्यातील वातावरण सध्या बऱ्यापैकी नॉर्मल झाले आहे. पुणे पूर्वपदावर आले असले तरी नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com